Ayodhya Ram Mandir : रुक्मिणीच्या माहेरातून सीतामातेसाठी जाणार पाचशे किलो कुंकू

Kaudanyapur : अयोध्येतून रामभक्त घेऊन जाणार शेकडो कुंकुमकलश...
Kumkum of Amravati.
Kumkum of Amravati.Sarkarnama
Published on
Updated on

Amravati : रुक्मिणीचे माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथून अयोध्येतील श्रीराम मंदिरातील सीतामातेच्या मूर्तीसाठी 500 किलो कुंकू पाठविण्यात येणार आहे. ‘सकल हिंदू समाजा’ने कुंकू पाठवण्‍याचा हा संकल्‍प केला आहे. बुधवारी (ता. 17) अमरावती येथून अनेक कुंकुमकलश अयोध्येकडे रवाना होतील, अशी माहिती सरी धर्मसभेचे अध्‍यक्ष आणि माजी राज्‍यमंत्री जगदीश गुप्‍ता यांनी दिली.

कपाळावर गंध, टिळा, कुंकू लावणे ही भारतीय संस्कृती आहे. महिलांच्या कपाळावर कुंकू लावणे हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंकवाची निर्मिती केली जाते. विदर्भातील अमरावतीचे कुंकू सर्वत्र प्रसिद्ध आहे. अशात रुक्मिणीच्या माहेरातून सीतामातेला सौभाग्याची ही भेट पाठविण्यात येणार आहे.

Kumkum of Amravati.
Amravati Mahayuti : अडसूळ, पोटे, बोंडे, खोडके, राणा यांचे गोडगोड बोला; बच्चूभाऊंचा कडवटपणा!

कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर श्री राजराजेश्वर माउली सरकार हे त्यांच्यासोबत प्रतीकात्मक कलशात कुंकू नेतील. उर्वरित कुंकू रुक्मिणी पीठाचे सेवक अयोध्येत पोहोचविणार आहेत. अमरावती शहरातील राजकमल चौकात श्री राजराजेश्वर माउली सरकार यांचा अभिवादन सोहळा यावेळी घेण्यात येणार आहे. सध्या कौंडण्यपूर येथे कुंकू संकलनाचे काम सुरू असून त्याचे कलश माउली सरकारच्या स्वाधीन केले जाणार आहेत. श्री राजराजेश्वर माऊली यांना 22 जानेवारी रोजी अयोध्‍येत होत असलेल्‍या प्राणप्रतिष्‍ठापना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्‍यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यात कुंकूनिर्मितीचे वैशिष्ट्य आहे. हळदीबरोबर चिंचोका, रताळ्याची पावडर, टोपिओका, डोलामॅट यांपासून कुंकूनिर्मिती केली जाते. अमरावतीत आता कुंकू तयार करणारे कारखाने बोटावर मोजण्‍याइतकेच शिल्‍लक राहिले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत अमरावतीमधील कुंकवाला मोठी मागणी होती. त्याची बाजारपेठही मोठी होती. कुंकू बनवण्याचा कालखंड हा सप्टेंबर ते मे असा नऊ महिन्यांचा असतो. अमरावतीमधील कुंकूनिर्मिती उद्योग मोडकळीस आल्यानंतर याकडे एकाही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने लक्ष दिलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रासायनिक प्रक्रिया करीत मोठ्या प्रमाणवर रंगमिश्रित घातक कुंकवाची विक्री सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. अशात पारंपरिक पद्धतीने तयार होणारे ‘इको फ्रेंडली’ कुंकू हद्दपार होत आहे. विदर्भातील कुंकूनिर्मिती उद्योगही अशाच राजकीय अनास्थेमुळे काळाच्या पडद्याआड जात आहे. त्यामुळे कुंकूनिर्मिती करणाऱ्यांनी आता पर्यायी व्यवसायांचा मार्ग पत्करला आहे. अशात शासनाने अमरावती जिल्ह्यात कुंकूनिर्मिती क्लस्टर तयार करून त्याची देश-विदेशात ‘मार्केटिंग’ केल्यास या भागात कुंकूनिर्मिती व विक्री करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ नक्कीच उपलब्ध होऊ शकते. यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची गरज आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Kumkum of Amravati.
Amravati : पोटेंच्या जे पोटात तेच ओठांवर आले, राणांनीही केला पाणी पाजण्याचा प्रयत्न; पण..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com