Amravati : पोटेंच्या जे पोटात तेच ओठांवर आले, राणांनीही केला पाणी पाजण्याचा प्रयत्न; पण..

Pravin Pote : महायुतीच्या मेळाव्यात तुफान फटकेबाजी; रवी राणांचे नाव न घेता टीका
Ravi Rana & Pravin Pote.
Ravi Rana & Pravin Pote.Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Melava : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या महामेळाव्याच्या निमित्ताने अमरावती येथे एकमेकांचे कट्टर वैरी असलेले नेते एकाच व्यासपीठावर आले खरे परंतु त्यापैकी काहींनी चालून आलेली संधी सोडली नाही. असाच काहीसा सामना बघायला मिळाला भाजपचे नेते तथा माजी मंत्री प्रवीण पोटे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्याबाबतीत.

अमरावती येथे रविवारी (ता. 14) महायुतीचा महामेळावा पार पडला. मेळाव्याच्या व्यासपीठावर भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, प्रहार जनशक्ती पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या नेत्यांचा महाकुंभ जमला होता. यात भाजपचे नेते माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी अमरावतीच्या राजकारणातील आपले कट्टर राजकीय वैरी असलेल्या आमदार रवी राणा यांच्यासंदर्भात नाव न घेता तुफान फटकेबाजी केली.

Ravi Rana & Pravin Pote.
Amravati Mahayuti : अडसूळ, पोटे, बोंडे, खोडके, राणा यांचे गोडगोड बोला; बच्चूभाऊंचा कडवटपणा!

प्रवीण पोटे यांनी आपल्या भाषणात नाव न घेता रवी राणांवर चांगलाच हल्ला चढवला. निवडणुकीच्या काळात महायुतीमधील सर्व घटक पक्षातील नेत्यांना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा  मानसन्मान दिला पाहिजे, असे पोटे म्हणाले हा सन्मान तर त्यांना मिळत नसेल तर कोणीही सोबत राहणार नाही, असा इशाराच पोटे यांनी आमदार रवी राणा यांना दिला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात प्रवीण पोटे अमरावतीचे पालकमंत्री होते. त्यावेळी आमदार रवी राणा यांनी प्रवीण पोटे यांच्यावर पालकमंत्री हे बालकमंत्री आहेत, अशी टीका केली होती. त्यावेळी अमरावतीच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. रविवारी त्याचा हिशोब प्रवीण पोटे यांनी चुकता करण्याचा प्रयत्न केला. रवी राणांचा पोटे यांनी त्यांच्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘जेव्हा मी पालकमंत्री होतो तेव्हा मला बालकमंत्री म्हटले. मग फडणवीस पालकमंत्री होते, तेव्हा त्यांना बालकमंत्री म्हणता का?’ असा सवाल आमदार पोटे यांनी यावेळी उपस्थित केला. स्थानिकांना चांगली वागणूक द्या, अशी सूचना वजा इशारा त्यांनी यावेळी राणा यांना दिला. स्थानिक लोकांशी चांगले वागायला हवे. आपल्यावर एखादा वाईट प्रसंग आला, तर दिल्ली-मुंबईचे लोक मदतीला धावून येत नाहीत. स्थानिक लोकच मदतीला धावतात, असा खोचक टोलाही आमदार रवी राणा यांना प्रवीण पोटे यांनी लगावला.

प्रवीण पोटे यांची ही तुफान फटकेबाजी आटोपल्यानंतर ते परत आपल्या आसनाकडे वळले. त्यावेळी आमदार राणांनी त्यांच्या घशाला कदाचित आपल्या नावाने ओरड केल्यामुळे कोरड पडली असेल अशा भावात बिसलरीची बाटली देत पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र पोटे यांनीही हसत हसत ‘नो थॅक्स’ म्हणत राणांच्या हाताचे पाणीही नको असाच काय जो जणू संदेश दिला. त्यामुळे पोटे यांच्या पोटात जे होते तेच ओठांवर आले अशी चर्चा सभास्थळी रंगली.

Edited By : Prasannaa Jakate

Ravi Rana & Pravin Pote.
Amravati News : अयोध्येला जाल तर तुमचा अंत निश्चित; रुक्मिणी विदर्भ पीठाच्या महाराजांना जिवे मारण्याची धमकी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com