यवतमाळ जिल्हा परिषदेत जुगार खेळणारे ८ कर्मचारी निलंबित...

यवतमाळ (Yavatmal) जिल्हा परिषदेची (ZP) प्रतिमा मलिन केली आणि गुन्हे दाखल झाल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
Yavatmal ZP
Yavatmal ZPSarkarnama
Published on
Updated on

यवतमाळ : जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात कर्मचारी जुगार खेळत असताना अवधुतवाडी पोलिसांनी (Police) धाड टाकली होती. या पोलिस कारवाईनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनी ८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यवतमाळ (Yavatmal) जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन केली आणि गुन्हे दाखल झाल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या (ZP) आवारात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जिल्हा परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ही कारवाई २८ जानेवारीच्या मध्यरात्री करण्यात आली होती. या कारवाईत अवधूतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रकाश कुद्रुपवार (वय 53, रा. प्रभातनगर, यवतमाळ), देवानंद जामनकर (वय 48, रा. शास्त्रीनगर) गणेश गोसावी (वय 55, रा. शिवम कॉलनी), प्रकाश व्यास (वय 58, रा. जिल्हा परिषद क्वार्टर), गुणवंत ढाकणे (वय 47, रा. जामनकरनगर), अनिल शिरभाते (वय 45, रा. जामनकरनगर), संदीप श्रीरामे (वय 45, रा. वैभवनगर), चरण राठोड (वय 53, रा. विदर्भ हाउसिंग सोसायटी, यवतमाळ) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 31 हजार 110 रुपये रोख, नऊ मोबाईल, पाच दुचाकी व दोन चारचाकी असा एकूण पाच लाख चार हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान एरावत चव्हाण (वय 55) हा घटनास्थळावरून फरार झाला होता, घटनास्थळावर त्याचा मोबाईल मिळाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरातील निर्मनुष्य राहणाऱ्या परिसरात जिल्हा परिषद कार्यालयातील काही निवृत्त वाहनचालक टाईमपास म्हणून पत्ते खेळत बसायचे. मग तेथे त्यांना काही नवीन सोबती मिळालेत. कार्यालय संपल्यानंतर काही कर्मचारीदेखील या ठिकाणीच जुगार खेळू लागलेत. रात्री उशिरापर्यंत तेथे जुगार चालत होता. त्यात काही मद्यप्रेमीही असल्याने त्यांच्या मद्यप्राशनाचा कार्यक्रमदेखील तेथेच चालत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार बिनबोभाटपणे सुरूच होता. त्यामुळे तेथे नियमित बसणारेही बिनधास्त होते.

गेल्या शुक्रवारी २८ जानेवारी रोजी अवधूतवाडी पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली आणि त्यांनी या जुगारावर छापा टाकला. जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अपर अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले, पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार, सचिन सरकटे, सुरेश मेश्राम, प्रदीप कुरडकर, दिनेश निबर्ते, बबलू पठाण, सागर चिरडे, धनंजय पोटपल्लीवार, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

Yavatmal ZP
Video: यवतमाळ जिल्हा परिषदेतील जुगारावर पोलिसांची धाड

जिल्हा परिषदेच्या आवारात जुगार खेळणे हा गंभीर प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे कर्मचारी त्या जुगार खेळण्याच्या घटनेत सहभागी असल्याचे दिसून येते. म्हणून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची व शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली. जिल्हा परिषद परिसरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत.

- कालिंदा पवार, अध्यक्षा, जिल्हा परिषद, यवतमाळ.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com