Sudhir Mungantiwar : लोकशाहीची फळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारा अर्थसंकल्प !

Budget 2023: 'सप्तर्षी योजना' म्हणून ओळखला जाईल असा हा अर्थसंकल्प आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Union Budget 2023 News : आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.

वनमंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प (Budget) नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, ‘हम सब एक है’, या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे.

विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित 'सप्तर्षी योजना' म्हणून ओळखला जाईल असा हा अर्थसंकल्प आहे. फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळं देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवीत आणि अंत्योदयाचं पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं ह्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे.

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar : '' आघाडी सरकारच्या काळात मीही अग्निपरीक्षा दिली..!'' सुधीर मुनगंटीवार असं का म्हणाले?

नाले सफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो करोडो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. देशातील नोकरदार मध्यमवर्गाचा देखील विचार ह्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. एकूणच भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाचा अमृतकाल सुरु असताना, आणि जग मंदीशी आणि इतर विविध समस्यांशी झुंजत असताना, ह्या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल तर टाकलंच आहे, पण त्याचवेळेस संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com