Sudhir Mungantiwar News : महाविकास आघाडी सरकारनं 2019 सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळातील कोट्यवधी वृक्षांच्या लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. आघाडी सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात मीही अग्निपरीक्षा दिली असं विधान आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी 'सकाळ' डिजिटलला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सर्वच प्रश्नांना अगदी दिलखुलास उत्तरे दिली. आघाडी सरकारच्या वृक्ष लागवड चौकशीच्या निर्णयावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, रामायणातही सीतेवर ज्यावेळी संशय घेतला गेला त्यावेळी रामाने देखील सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली. त्याच मार्गावर पुढे जात मीही न्यायालयाला चौकशी करण्यासंबंधीचं लेखी पत्र दिलं होतं. मला माहिती होतं. की ही वृक्ष माझ्या विभागाने लावली नाही तर लोकसहभागातून लावली गेली आहे. आनंदवनात या मोहिमेत वृक्ष लागली तसेच इंडियन ईको आर्मीत देखील वृक्ष लागली आहे.
मी वनमंत्री असताना साधारण एकूण लोकसहभागातून 54 कोटी वृक्ष लागले. काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. पण त्यांना ही वृक्षलागवड आणि हे अभियान समजलेच नाही. हे अभियान फक्त वनमंत्र्यांचं किंवा वनविभागाचं नव्हतं. हे अभियान विविध पर्यावरणप्रेमी,वृक्षप्रेमी संस्था लोकांचं होतं. आम्ही फक्त या अभियानात सपोर्टीव्ह भूमिकेत होतो. त्यांनी हे वृक्ष लावले होते. पण वनविभाग रोपटं विकत घेतं आणि त्याची लागवड करते असा काहींचा गैरसमज झाला.
अर्ध्या शरीराशी संबंधित विभाग माझ्याकडे आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकात ताणतणाव कमी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग आणि त्याचं काम लोकापर्यंत पोहचायला हवं. त्यासाठी आम्ही एक पोर्टलची निर्मिती सुरु आहे. त्याला 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी नोंद केली आहे असे मतही मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
मी अर्थमंत्री असताना अकरा हजार नऊशे पंचाहत्तर कोटी रुपये रेव्हन्यू सरप्लस केलं. हे देशातील सर्वाधिक रेव्हन्यू सरप्लस करण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. तसेच दोनदा मला बेस्ट अर्थमंत्री म्हणून सन्मानित केलं असेही मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवारांचं वृक्षारोपण अभियान चौकशीच्या फेर्यात!
फडणवीस सरकारच्या काळात ३३ कोटी वृक्षांची लागवड केल्याचा दावा केला सरकारनं केला होता. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर वर्षाकाठी साधारण १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, नेमकी किती वृक्षांची लागवड झाली याबद्दल अनेकांना संशय होता. याचमुळे महाविकास आघाडी सरकारनं 2019 सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळातील कोट्यवधी वृक्षांच्या लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.