राणा दांपत्याला शक्तीप्रदर्शन भोवलं; अमरावती पोलिसात गुन्हा दाखल

Navneet Rana| Ravi Rana| पोलीस निरीक्षक स्वाती पवार यांच्या तक्रारीवरुन राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Navneet Rana| Ravi Rana|
Navneet Rana| Ravi Rana|

अमरावती : नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. परवानगी नसतानाही रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर्स लावून हनुमान चालिसा पठण आणि आरती करणे राणा दांपत्याच्या अंगलट आले आहे. त्यामुळं आता अमरावती पोलीसांनी राणा दांपत्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (A case was registered against the Rana couple)

अमरावतीतील शंकर नगर परिसरात राणा यांच्या घरासमोरील रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण करणे आणि रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावून शक्ती प्रदर्शन केले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक स्वाती पवार यांच्या तक्रारीवरुन राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, जितू दुधाने, बाळू इंगोले प्रवीण गुल्हाने, अजय मोरया, जयश्री मोरया, साक्षी उमप अधिक 8 ते 10 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navneet Rana| Ravi Rana|
Imtiaz Jalil : कदाचित खैरेंनीच ते पैसे आम्हाला आणून दिले असतील ; त्यांचे आरोप एन्जाॅय करतो..

तब्बल दिड महिन्यांच्या कालावधीनंतर अमरावतीत आगमन होताच राणा दाम्पत्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. याशिवाय ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले. (Navneet Rana and Ravi Rana news) राणा दांपत्य त्यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवासस्थानी पोहचल्यानंतर रात्री राणा दांपत्याचा दुग्धभिषेक सोहळा पार पडला. नवनीत राणा आणि रवी राणा दोघांना सोबत बसवून दुग्धभिषेक करण्यात आला. नागरिकांच्या समस्या सोडविताना एक नवा संकल्प करून पुढील वाटचाल करणार असल्याचं सांगत राणा दाम्पत्याने सांगितले.

दरम्यान, गेल्या महिन्यात राणा दांपत्याने ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला होता. खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी काल मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. बाहेर शिवसैनिक हे राणा दांपत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण बनत चालेले होते. अखेर खार पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना घराबाहेर काढून त्यांना खार पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com