Raj Thackeray : चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी पाठवली राज ठाकरेंसाठी खास भेट…

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंसाठी (Raj Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण रेकॉर्ड असलेला तिरंगा भेट म्हणून पाठवला आहे.
Sudhir Mungantiwar's givt for he Raj Thackeray.
Sudhir Mungantiwar's givt for he Raj Thackeray.Sarkarnama

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते यांची जवळीक आणि वाढत्या भेटीगाठींची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. काल राज ठाकरे यांनी नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली आणि आज चंद्रपुरात भाजप नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज ठाकरेंसाठी खास भेट पाठवली. त्यामुळे ही चर्चा आजही सुरू आहे.

Sudhir Mungantiwar's givt for he Raj Thackeray.
शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचाच हक्क : संपत्तीला वारस असतो, पक्षाला नाही - मुनगंटीवार

भाजपच्या (BJP) चंद्रपूरच्या (Chandrapur) माजी महापौर राखी कंचर्लावार यांनी आज खास राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण रेकॉर्ड असलेला तिरंगा भेट म्हणून पाठवला आहे. सोबतच राज ठाकरे यांचं पेंटींगही त्यांना भेट देण्यात आलं आहे. राखी कंचर्लावार यांच्यासोबत यावेळ भाजप नेते प्रकाश धारणे हेसुद्धा होते. या दोघांच्या मार्फत मंत्री मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांच्यासाठी ही अनोखी भेट पाठवली आहे. यानंतर मनसे आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युती होणार का, या चर्चेने विदर्भात जोर पकडला आहे.

काल नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना मनसे आणि भाजप युती होणार का, असा प्रश्‍न विचारला होता. त्यांनी युतीचा साफ इन्कार केला. पण भाजप नेते आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. आता आगामी काळात भाजप-मनसे युती होणार की नाही आणि पुढे काय घडामोडी होणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनासुद्धा याबाबत माहिती नाही. प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना विचारणा केली असता, पक्षप्रमुख याबाबत काय ते बोलतील आणि तशी घोषणा करतील, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com