शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचाच हक्क : संपत्तीला वारस असतो, पक्षाला नाही - मुनगंटीवार

Sudhir Mungantivar : एकनाथ शिंदे यांचाच शिवसेनेवर हक्क आहे. कारण त्यांच्याकडे ४० आमदार आहेत.
Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray Latest News
Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेने दाखल केलेल्या शिंदे गटाच्याविरोधातील याचिकेवर आज घटनापीठाने सुनावणी घेतली. या सुनावणी दरम्यान शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गट यांचे वकील नीरज किशन कौल यांनी केली. मात्र न्यायालायाने या सर्व बाबींवर २७ सप्टेबरलाच सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावर आता राज्याचे मंत्री व भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे, मात्र मला वाटतं एकनाथ शिंदे यांचाच शिवसेनेवर हक्क आहे. कारण त्यांच्याकडे ४० आमदार आहेत, अशी प्रतिक्रीया मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray Latest News
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? मढ येथील बांधकामाचे महापालिकेकडून चौकशीचे आदेश

एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे, मात्र मी म्हणतो शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच पूर्ण अधिकार आहे. कारण त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे. संपत्ती वारसा हक्काने पुढील पिढीकडे जाते. मात्र पक्षाचे तसे नसते. पक्षावर कार्यकर्त्यांचाच हक्क असतो.पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभा राहातो. त्यामुळे पक्षावर पहिला हक्क हा कार्यकर्त्यांचा असतो. 40 आमदारांनी हिंदूत्त्वाचा विचार केला. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मिळवलेल्या सत्तेला लाथ मारली. मात्र अजूनही काही लोक खुर्चीच्या प्रेमात आहेत, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray Latest News
'बापाचे नाव नसते तर उद्धव ठाकरेंना फोटो काढत..' भाजप नेत्याची घणाघाती टीका

यावेळी शिवसेनेकडून अमित शहांवर करण्यात आलेल्या टीकेवरसुद्धा मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिले. 'उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं ते वक्तव्य अमित शहांसाठी लागू होत नाही, खरं तर ते वाक्य तंतोतंत उद्धवजींसाठी (Uddhav Thackeray) लागू होतं. वरून कीर्तन म्हणजे स्वातंत्रवीर सावरकरांचे प्रेम आणि खालून लावणी म्हणजे, खुर्चीचा अन् सत्तेसाठी त्यांनी चालविलेला तमाशा. हे त्यांचं त्यांना स्वतःला वाटतं. पण हे करताना ते एक गोष्ट विसरले की, दुसऱ्यांकडे एक बोट दाखवलं तर उरलेली बोटं आपल्या स्वतःकडेच असतात. त्यामुळे त्यांनी बोललेले ते वाक्य त्यांनाच लागू होतं.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com