Bachchu Kadu: मोठी बातमी: बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी...

Maharashtra Politics A third front will be formed in Maharashtra: बच्चू कडू यांची प्रहार संघटना,संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष,रविकांत तुपकर यांची संघटना व आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडणार आहेत, याबाबतची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांना मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू तिसरी आघाडी काढणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

बच्चू कडू यांची प्रहार संघटना,संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष,रविकांत तुपकर यांची संघटना व आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे. बच्चू कडू व संभाजी राजे हे पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडणार आहे. लाडकी बहीण योजना चांगली असली तरी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्याबाबत सरकार काहीही करीत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघातून प्रहारकडून आपला उमेदवार मैदानात उतरविला होता. गेल्या सहा महिन्यात त्यांनी बच्चू कडू यांनी महायुतीच्या विरोधात विधाने केली आहेत. त्यामुळे ते महायुतीतून बाहेर पडतील, अशी परिस्थिती आहे.

Bachchu Kadu
Raghunath Patil: 'मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी'; रघुनाथदादांनी मुख्यमंत्र्यांना काढला चिमटा

माजी खासदार छत्रपती संभाजी राजे आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून बच्चू कडू उपस्थित होते. शिबिराचा समारोप झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्यात राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com