Parasgaon Incident: मंदिराच्या शेडवर झाड कोसळलं; चौघांचा मृत्यू; आठ गंभीर जखमी, 20 ते 25 जण दबल्याची भिती!

Akola Parasgaon Incidence Tree Collapsed: मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती..
Parasgaon Incident : Akola News
Parasgaon Incident : Akola News Sarkarnama
Published on
Updated on

Akola Accident News : राज्यात आज अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या अवकाळी पावसामुळे विदर्भ विभागातील (Vidarbh News) अकोला जिल्हा येथील पारसगाव (Parasgaon Incident) या ठिकाणी येथे मोठी दुर्दैवी घटना घडली. यामुळे आता राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Parasgaon Incident : Akola News
Tigers in India: भारतात वाघांची संख्या वाढली! पंतप्रधान मोदींनी थेट आकडेवारीच जाहीर केली

एका मंदीराच्या शेडवर झाड कोसळल्याचा घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या शेडखाली २० ते २५ भाविक अडकून पडल्याची भिती व्यक्त होत आहे. यातून पाच जणांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अवकाळी पावसामुळे मंदीराच्या शेडवर अचानक पडलेल्या या झाडामुळे ही मोठी दुर्घटना घडली. कोसळलेलं हे झाड हटवण्यात मोठी समस्या निर्माण होत होती. आज सायंकाळी साडेसात ते पावणेआठ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अकोल्यातील गावात बाबूजी महाराजांचं मंदीर आहे. यामुळे येथे रविवारी रात्री मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले होते. नेमक्या याचवेळी अवकाळी पावसामुळे मंदिराच्या बाजूला असलेलं जुनं निंबाचं मोठं झाड या शेडवर पडलं. (Latest Maharashtra News)

Parasgaon Incident : Akola News
Narendra Modi Degree : पंतप्रधान मोदींना डिवचण्याचा 'आप'चा प्लॅन; 'डिग्री दिखाव' कँपेनमुळे वाद चिघळणार?

दरम्यान, या दुर्घटनेच्या ठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत चार मृत्यू झाल्याचा आकडा समोर येत आहे. मात्र शेडखाली अजूनही लोक दबलेले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, (Latest Vidarbha News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com