Narendra Modi Degree : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करताना दिसतात. आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पदवीबाबत विचारणा केली होती. याबाबत केजरीवालांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला होता. या सर्व प्रकारानंतर आता 'आप'ने डिग्री दाखवा कॅम्पेन सुरु केलं आहे. दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
आप नेत्या आतिशी यांनी सांगितलं की, "आम्ही आजपासून एक कॅम्पेन सुरु करणार आहोत, या कॅम्पेनचं नाव 'डिग्री दाखवा' कॅम्पेन असं असेल. आजपासून पुढील काही दिवस दररोज आम आदमी पार्टीचे नेते डिग्री दिखान मोहीमेत सहभागी होणार आहेत. याची सुरुवात मी स्वत: करणार आहे."
आपली डिग्री माध्यमांच्या कॅमेरांना दाखवत आतिशी म्हणाल्या, "माझं दिल्ली युनिव्हर्सिटीत बीए झालं आहे. ही माझी डिग्री आहे. यानंतर मी ऑक्सफोर्डमधून विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण घेतलं आहे. त्याची ही खरीखरी कागदपत्रे मी दाखवत आहे. यासोबतच, मी माझं आणखी एका मास्टर्स ऑक्सफोर्डमधूनच झालं आहे. ही त्याची खरी डिग्री आहे."
"मी माझ्या तीनही पदव्या मी जनतेसमोर मांडल्या आहेत. ही आमची मोहीम आहे. यातून आम्ही आवाहन करतो की, इतर नेत्यांनीही आपल्या डिग्र्या दाखवाव्यात. विशेषत: आम्ही भाजप नेत्यांना आवाहन करतो की, त्यांच्याकडे पदव्या असतील तर त्यांनी दाखव्यावात," असं आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.