ACB Trap : चंद्रपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले; लागोपाठ कारवाई सुरूच

Chandrapur Corporation : फ्लॅटच्या नोंदीसाठी मागितली होती लाच
ACB
ACB Sarkarnama

ACB Trap : वीजप्रवाह सुरळीत करण्यासाठी तांदळाची लाच मागण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार चंद्रपुरात नुकताच समोर आला होता. त्याच दिवशी एका ग्रामसेवकालाही लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. आता मालमत्तेवर नाव चढविण्यासाठी 15 हजार रूपयांची लाच मागणाऱ्या महनगरपालिकेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. फारूख मुस्ताक शेख असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 23) एसीबीने कारवाई करीत त्याला अटक केली. एसीबीकडून सातत्याने कारवाईचे सत्र राबविले जात आहे. अशात लाचखोरीचे प्रकार थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे चंद्रपुरात हे चाललय तरी असा, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीने स्वतःच्या व मुलाच्या नावे दोन फ्लॅट घेतले. हे फ्लॅट आपल्या व मुलांच्या नावावर करण्यासाठी तक्रारकर्त्याने महानगरपालिका झोन क्रमांक एक येथील लिपीक फारूख अहमद मुश्ताक शेख यांच्याकडे कागदपत्र सादर केले. काम करण्यासाठी शेख यांनी तक्रारकर्त्याकडून 15 हजार रूपयांची मागणी केली. पण त्यांची लाच द्यायची मुळीच इच्छा नव्हती. लाचखोरीच्या या प्रकाराची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली. गुरुवारी (ता. 22) एसीबीने याप्रकरणाची पळताळणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ACB
MSEDCL Bribe : लाचखोरीचा कळस, लाच कशाची तर तांदळाची; एसीबीने केला ‘ट्रॅप’

शुक्रवारी (ता.23) दुपारच्या सुमारास शेख यांना 15 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कार्यवाही एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, संजय पुरंदरे, चंद्रपूर एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पार पडली. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर लाचखोरांना पकडण्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच वीजप्रवाह सुरळीत करण्यासाठी चक्क तांदळाची लाच मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. एसीबीकडून सातत्याने लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. पण लाच घेण्याचे प्रकार थांबायचे काही नाव घेत नाही.

चंद्रपूर एसीबीचे सूत्र हाती घेताच पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. शासकीय कामांसाठी कुणीही लाच मागत असेल, तर तातडीने याबाबतची तक्रार एसीबीकडे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावात लाच घेण्याचे प्रकार खुलेआम घडत आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी आता प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती हाती घ्यावी, अशी मागणी समोर येत आहे. जनजागृतीसोबतच राज्य व केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

ACB
Chandrapur Politics : पंचायत समितीचे उपसभापती झाले वैज्ञानिक अधिकारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com