Uddhav Thackeray Nagpur: 'भुजबळांबाबत आता तिकडं 'चैना-मैना' काही होणार नाही'; ठाकरे म्हणाले, 'ते संपर्कात...'

Uddhav Thackeray on Mahayuti Government : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावताच, पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली.
Uddhav Thackeray | Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray | Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार टीका केला. यावेळी ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश होत, नसल्यावरून टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "छगन भुजबळांबरोबर झालेलं फार वाईट वाटतं. छगन भुजबळांसारखे (Chhagan Bhujbal) अनेकांबरोबर, असं झालं आहे. अनेकांची जॅकेट वाट पाहत होती. ती आता तशीच राहणार आहे. त्याविषयी सहानुभूती आहे. लाडका आमदार, अशी काही योजना आहे का? तशी सरकारने करावी. काय झालं आहे की, सरकारची झाली दैना. त्याच्यामुळे तिकडं 'चैना-मैना' काही होणार नाही. त्यामुळे त्यांचे 'वहा नहीं रहेना', हे योग्य आहे".

Uddhav Thackeray | Chhagan Bhujbal
Sanjay Raut : जरांगेंविरोधात पुरेपुर वापर; राऊत म्हणाले, ''अदृश्य शक्तीनं' भुजबळांना आता वाऱ्यावर सोडलं'

उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या (Mahayuti) मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या दिरंगाईवर देखील टोलेबाजी केली. अद्याप खाते वाटप नाही. मग हे अधिवेशन कशासाठी? अधिवेशन गमंत म्हणून सुरू असेल, तर गंभीर आहे. आतापर्यंत खाते वाटप व्हायला हवे होते. ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना मंत्रीपद दिले आहे.

विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा सर्वाधिक आहे. यातच भुजबळांबाबत फार वाईट वाटतं. सरकारची दैना झाली आहे. तिकडं त्यांचे 'चैना-मैना' काही होणार नाही. त्यामुळे त्यांचे 'वहा नहीं रहेना', हे योग्य असून, ते माझ्या अधूनमधून संपर्कात असतात, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सीएम फडणवीसांवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऐव्हरी वोट फाॅर मॅग्नेटीक महाराष्ट्र', असे म्हटले होते. त्यानुसारच आम्ही महाराष्ट्रात काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी 'ऐव्हरी वोट फाॅर मशीन', असा टोला लगावला. विधानसभेतील निकाल अनपेक्षित आहे, असे सांगून 'ईव्हीएम सरकार'चे अधिवेशन सुरू असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

Uddhav Thackeray | Chhagan Bhujbal
Top 10 News : 'या' नेत्यांमध्ये ‘मिले सूर मेरा तुम्हारा’! ; महायुतीत नाराजीनाट्य अन् राऊतांनी अचूक टायमिंग साधलं - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

माझे 20 आमदार काफी आहेत

विरोधी पक्षनेता पदाबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर माझे 20 आमदार काफी आहेत, असा विश्वास व्यक्त केला. विरोधी पक्षनेता सभागृहाला द्यायचा की नाही, द्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे.

अजितदादांची जुनीच सवय

उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही 24 तासांपासून नाॅट रिचेबल आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी ही त्यांची जुनीच सवय आहे. आतापर्यंत ते स्वतः कोणावर तरी नाराज असायचे. आता त्यांच्यावरच कोणीतरी नाराज आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

आता निकष बदलू नका, ठाकरेंचा इशारा

लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती होती, हे आता सिद्ध झालं आहे. निकष न बदलता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात तत्काळ 2100 रुपये द्यावे. पैसे देताना आवडती-नावडती असे होता कामा नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com