१७ वर्षानंतर धानोरकर दाम्पत्यानी घडवली कलावतीची राहुल गांधींसोबत भेट...

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी बांदुरकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यातील अनेक खडतर प्रवासाविषयी जाणून घेतले आणि सध्या असलेल्या समस्यांविषयीदेखील चर्चा केली.
Balu Dhanorkar, Pratibha Dhanorkar and Nana Patole with Rahul Gandhi.
Balu Dhanorkar, Pratibha Dhanorkar and Nana Patole with Rahul Gandhi.Sarkarnama

नागपूर : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदुरकर या शेतमजूर महिलेची सतरा वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. सध्या राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने विदर्भात दाखल झाले आहेत. वाशीम येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती सोहळ्यात कलावती बांदूरकर यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले. खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी १७ वर्षानंतर ही भेट घडवून आणली.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कलावती बांदुरकर कापूस वेचण्याचे काम करतात. २००५ मध्ये त्यांचे पती परशुराम बांदुरकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांना भेट दिली. त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ देखील सुरू झाला आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातले जळका गाव प्रसिद्ध झाले. या घटनेला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रात (Maharashtra) असल्याच्या पार्श्वभूमीवर काही माध्यमांनी कलावती बांदुरकर सध्या काय करतेय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी बांदुरकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यातील अनेक खडतर प्रवासाविषयी जाणून घेतले आणि सध्या असलेल्या समस्यांविषयीदेखील चर्चा केली. त्यानंतर आज कलावती बांदूरकर यांनी वाशीम येथे राहुल गांधी यांची भेट घेतली.

कॉंग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी ही भेट घडवून आणण्यात पुढाकार घेतला. या निमित्ताने शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील समस्या पुन्हा राहुल गांधी यांच्यासमोर मांडण्यात आल्या. दरम्यान कलावती बांदुरकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला आणि खासदार बाळू धानोरकर यांचे आभार व्यक्त केले.

Balu Dhanorkar, Pratibha Dhanorkar and Nana Patole with Rahul Gandhi.
Balu Dhanorkar : खासदार बाळू धानोरकर म्हणतात, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या...

कोण आहेत कलावती बांदुरकर ?

कलावती बांदुरकर या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने 2005 मध्ये सततच्या नापिकीने आणि कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केली होती. 2008 साली त्यांची भेट राहुल गांधी यांनी घेतली होती. त्यानंतर जेव्हा राहुल गांधी यांनी याबद्दल संसदेमध्ये माहिती दिली तेव्हा एकच खळबळ उडाली होती. कलावती अचानक प्रकाशझोतात आल्या. देशभरातील मीडियाचे पाय जळका गावाकडे वळू लागले होते. त्यांचा पोस्टर वुमन म्हणून वापर होऊ लागला. त्यांना आर्थिक मदत देखील मिळाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com