Balu Dhanorkar : खासदार बाळू धानोरकर म्हणतात, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या...

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.
Balu Dhanorkar and Ratan Tata
Balu Dhanorkar and Ratan TataSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि माजी अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्रातील (Maharashtra) एकमेव खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

रतन टाटा (Ratan TaTa) हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अनेक संशोधनासाठी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था उभारण्यासाठी आर्थिक मदत केली. शिवाय, त्यांचे समाजसेवेचे कार्यदेखील अतिशय मोठे आहे.

दरम्यान, उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट आणि उद्योगसमुहाच्या वतीने त्यांनी तब्बल १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत केली. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठे आव्हान आहे, असेही रतन टाटांनी म्हटले आहे.

Balu Dhanorkar and Ratan Tata
आदिवासींसाठी सरसावले बाळू धानोरकर; म्हणाले, स्वतंत्र रेजिमेंट निर्माण करा...

त्यांच्या कार्याची दखल घेत याआधीही त्यांना सन २००८ मध्ये पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन २००६ मध्ये महाराष्ट्र भूषण आणि २००० मध्ये पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टाटा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले आहेत. २८ डिसेंबर १९३७ रोजी रतन टाटा यांच्या जन्म झाला. ते ८४ वर्षांचे आहेत. त्यांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार देण्यात आला नसल्याने दुःख झाल्याची भावना पत्रात खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे त्यांच्या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. आपल्या या मागणीसाठी खासदार धानोरकर आग्रही असून याचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com