Navneet Rana Vs Yashomati Thakur : इथल्या इथं हिशेब पूर्ण! नवनीत राणांच्या 'अ‍ॅक्शन'ला, यशोमतींची 'रिअ‍ॅक्शन'

Yashomati Thakurs reaction video on Navneet Ranas action : अमरावतीमधील भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी प्रचारफेरीत केलेली धनुष्यबाणाची 'अ‍ॅक्शन'चा व्हिडिओ आणि त्यांच्या पराभवानंतर, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विजयी मिरवणुकीतून त्यावरच्या 'रिअ‍ॅक्शन'चा व्हिडिओ, वेगानं व्हायरल झाला आहे.
Yashomati Thakur and Navneet Rana
Yashomati Thakur and Navneet Ranasarkarnama

Amravati Lok Sabha Result : राजकारणं समोरच्या गृहीत धरलं की, फसगतं होते. राज्यातील लोकसभेची निवडणूक, अशीच काहीशी झाली. राजकीय नेत्यांना धडा देऊन गेली. महायुतीच्या नेत्यांनी या निवडणुकीत केलेल्या वल्गना आणि 'अ‍ॅक्शन'चे मीम्स् समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. अमरावतीमधील भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी प्रचारफेरीत केलेली धनुष्यबाणाची 'अ‍ॅक्शन'चा व्हिडिओ आणि त्यांच्या पराभवानंतर, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विजयी मिरवणुकीतून त्यावरच्या 'रिअ‍ॅक्शन'चा व्हिडिओ, वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवर 'इथल्या इथंच हिशोब पूर्ण', अशी मिश्किल टिप्पणी होऊ लागली आहे.

अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात लढत झाली. नवनीत राणा यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव झाला. ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपकडून लढली गेली. नवनीत राणा या निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्यांवर भलत्याच आक्रमक होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला होता. ठाकरे यांनी कसे हिंदुत्व सोडले हे सांगताना त्या थकत नव्हत्या. यासाठी त्या 'मातोश्री'वर जाऊन हनुमान चाळीशा म्हणणार, असे चॅलेंज दिले होते. ठाकरेंविरुद्धचा संघर्ष राणी यांनी पेटवला होता.

ठाकरे यांच्या दिशेने चालून जाताना मुंबईकडे गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याविरोधात राणा दाम्पत्याविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले. यातून त्यांना न्यायालयीन कोठडीत राहावं लागलं. ठाकरेंशी संघर्ष केल्यामुळे नवनीत राणा यांना भाजपकडून बक्षीस म्हणून अमरावती लोकसभेचे तिकीट दिले. नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा निवडून विकास कामांपेक्षा हिंदुत्वाच्या मुद्यावर नेली.

राणा यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार वानखेडे होते. वानखेडे यांच्या प्रचारात असलेल्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी असलेला राणा यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या निवडणुकीत तो देखील उफाळला होता. दोन्ही महिला एकमेकांवर शाब्दिक 'प्रहार' करत होते. यातून राणा यांची निवडणुकीतील वर्तणुकीत दिवसेंदिवस बदल दिसत होता. प्रचार फेऱ्यांमधून तो झळकत होता. या वर्तणुकीवर 'प्रहार'चे बच्चू कडू यांनी बोट देखील ठेवले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yashomati Thakur and Navneet Rana
Amravati Loksabha Election 2024 Winner: नवनीत राणांची 'अधुरी एक कहानी'; 'दिल्लीवारी'चं स्वप्नं भंगलं, वानखेडेंचा विजय

नवनीत राणा यांनी प्रचारफेरीत धनुष्यबाणाची 'अ‍ॅक्शन' केली होती. या 'अ‍ॅक्शन'चे मीम्स् चांगलेच व्हायरल झाले. आता नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे वानखेडे यांचा विजय झाला आहे. अमरावतीमध्ये तशी विजय मिरवणूक काढली गेली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या देखील मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

एका वाहनावर उभ्या राहून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत होत्या. याचवेळी त्यांनी धनुष्यबाणाची अ‍ॅक्शन केली. ठाकूर यांची ही रिक्शन राणा यांच्या 'अ‍ॅक्शन'ला होती. ठाकूर यांनी ही 'रिअ‍ॅक्शन' करून राणा यांचा इथल्या इथं हिशोब पूर्ण करून दिल्याची खुमासदार चर्चा संपूर्ण राज्यातील महिला राजकीय नेत्यांमध्ये रंगली आहे. यावर 'अ‍ॅक्शन'वर रिअ‍ॅक्शनचे मीम्स् सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

Yashomati Thakur and Navneet Rana
Navneet Rana : नवनीत राणांचा पराभव भाजपच्या जिव्हारी; लोकसभेच्या निकालानंतर पहिला राजीनामा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com