Amravati Loksabha Election 2024 Winner: नवनीत राणांची 'अधुरी एक कहानी'; 'दिल्लीवारी'चं स्वप्नं भंगलं, वानखेडेंचा विजय

Navneet Rana Vs Balwant Wankhede : एक्झिट पोलमध्ये अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर दाखवण्यात आले होते.महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे यांना धक्का बसण्याची शक्यता पोलमध्ये पुढे येत होती. पण...
Navneet Rana
Navneet Rana Sarkarnama

Amravati Lok Sabha Result 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस,असा राष्ट्रीय स्तरावरील थेट मुकाबला रंगणार होता.मात्र, बच्चू कडू यांनी यात उडी घेतली.

त्यामुळे मतमोजणीच्या उंबरठ्यावरसुद्धा विजयाबाबत फिफ्टी-फिफ्टीचे समीकरण लावले जात होती.राष्ट्रवादी काँग्रेसमधून नवनीत राणा यांनी भाजपात घेतलेल्या 'हनुमान उडी'ला रोखण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे अमरावतीत धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविण्यात येत होती.

आता अमरावतीत धक्कादायक निकालाची नोंद झाली असून महायुतीतील भाजपच्या 'स्टार' नेत्या नवनीत राणा यांना पराभव स्विकारावा लागला असून काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे 18 ते 20 हजारांच्या मताधिक्क्यांने निवडून येणार आहे.

एक्झिट पोलमध्ये अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर दाखवण्यात आले होते.महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे(Balwant Wankhede) यांना धक्का बसण्याची शक्यता पोलमध्ये पुढे येत होती.

पण आजच्या निकालात अमरावतीमध्ये धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. नवनीत राणांचा पराभव करत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी अमरावतीत विजय खेचून आणला आहे.

अमरावती मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून पासून चर्चेत होता.अमरावतीतून भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीने बळवंत वानखेडेंना उमेदवारी दिली होती.

मात्र,राणा यांच्या उमेदवारीला प्रहारच्या बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला होता. अकरावी फेरीअखेर नवनीत राणा यांना 3 लाख 4 हजार 669, बळवंत वानखेडे यांनी 3 लाख 28 हजार 868,प्रहारच्या दिनेश बूब यांना 47 हजार 594 आणि आनंदराज आंबेडकर यांना 9 हजार 274 मतं मिळाली होती.

यासाठी बच्चू कडू यांनी प्रहारकडून दिनेश बुब यांना राणांच्या विरोधात मैदानात उतरवलं होतं. त्यामुळे या मतदारसंघात नवनीत राणांना धक्का बसणार की काय? अशा चर्चा सुरु होत्या. अशातच आता समोर आलेली एक्झिट पोलची आकडेवारी राणा यांना दिलासा देणारी तर बच्चू कडू आणि बळवंत वानखेडे यांना मोठा धक्का देणारी असल्याचं दिसत आहे. शिवाय एक्झिट पोलचा हा अंदाच केवळ अंदाज राहणार की तो सत्यात उतरणार हे चार जूनलाच स्पष्ट होईल.

Navneet Rana
Sharad pawar PC : मंदिर-मशिदीवरुन राजकारण करणाऱ्यांना धडा, शरद पवारांनी सुनावले

एकीकडे काँग्रेसला या मतदारसंघात यंदा ‘अ‍ॅडव्हॉन्टेज’ असल्याचे जाणकार सांगू लागले आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराकडून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत होती. पण गुलाल कोण उधळणार हे येत्या चार तारखेलाच कळेल. दोन बलाढ्य राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह यंदाच्या निवडणुकीत असल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या अस्तित्वाची ही लढाई ठरणार होती.

यंदा नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार असल्याने त्यांनी धोका दिल्याची भावना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये होती. त्याचेच प्रतिबिंब या निवडणुकीच्या मतदानात दिसून येणार असल्याचे मानले जात होते. त्याचाच फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना झाल्याचे बोलले जात आहे.

Navneet Rana
Nitin Gadkari Win In Nagpur : नितीन गडकरी नाम ही काफी है..! ठाकरेंचा 'करेक्ट कार्यक्रम' अन् विजयाची हॅटट्रिक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com