Maratha Reservation and State Govt : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं, राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी, साखळी उपोषणं सुरू आहेत. याशिवाय मराठा समजातील तरुण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचलत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगेंनीही उपोषण सुरू केलेलं आहे, त्यामुळे मराठा समाज बांधव अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या हालचालींनाही वेग आल्याचे दिसत आहे.
कारण, मराठा आरक्षणाबाबत मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीकडून राज्य ससरकारने माहिती मागवली आहे. समितीने आतापर्यंत काय कामे केली, याबाबतचा अहवाल मराठा आरक्षण उपसमितीला सादर करावा लागणार आहे.
याशिवाय, मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण त्यांनी थांबवावे, यासाठीही सरकार प्रयत्नशील दिसत आहे. शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दोन दिवसांत मार्गी लागणार, असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर मराठवाड्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळमध्ये येणार आहेत. त्या ठिकाणी मराठवाड्यातील शिंदे गटाचे आमदारही जाणार आहेत. मराठा आरक्षण कसं मिळवता येईल? यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत, अशी माहिती आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.