राष्ट्रवादीनंतर शिवसेना नेते किशोर तिवारीही सरसावले आर्यन खानच्या सुटकेसाठी...

तिवारी Kishor Tiwari यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आर्यन खानच्या Aryan Khan सुटकेच्या मागणीसह एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
Aryan Khan
Aryan Khansarkarnama
Published on
Updated on

नागपूर : छटाकभर गांजा सापडल्यानंतर आर्यन खान पेडलर होतो, तर ३००० किलो ड्रग्ज सापडल्यानंतरही काही होत नाही. क्रूझवर केलेल्या कारवाईमध्ये एनसीबीच्या हाती काही लागले नाही. तरीही आर्यनला जामिन मिळालेला नाही. समीर वानखेडे भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करीत आहे, असा आरोप करीत शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला बॉलीवड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची बाजू राष्ट्रवादी काँग्रेस लावून धरीत असतानाच किशोर तिवारी यांनीही त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आर्यन खानच्या सुटकेच्या मागणीसह एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. एनसीबीसुद्धा भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ई-मेलद्वारे याचिका दाखल केली असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. एकीकडे ३ हजार किलो ड्रग्ज मिळतात. मात्र मुंबई किंवा बॉलिवूडला धरून एनसीबी बदनामी करीत आहे. त्यात काही लॉजिक काही निघत नाही. एनसीबी ही स्वतंत्र संवैधानिक संघटना असून आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहे. आर्यनची केस ही क्षुल्लक केस आहे. त्यात काही रिकव्हरी व पजेशन नाही. आर्यनला २४ तासासाठी अटक करण्यात आली. नंतर त्याला इंटरनॅशनल पेडलर ठरवल्या गेले. मग त्यात इंटरनॅशल रॅकेटही आले. या सर्व ट्रायलच्या गोष्टी असून त्याला जामीन मिळणे हा त्याचा अधिकार आहे, असे तिवारी यांनी सांगितले. इतरांना जामीन मिळतो. मात्र आर्यनला १७ दिवसांपासून आत ठेवले आहे, याकडे तिवारी यांनी याचिकेत लक्ष वेधले आहे.

Aryan Khan
आर्यन खान ड्रग्जचे नियमित सेवन करायचा : एनसीबीचा कोर्टात दावा

वानखेडेंचं काम कार्यकर्त्यांसारखे

एनसीबीने मूलभूत हक्कांचा भंग केला आहे. आर्यनचे मूलभूत अधिकार गोठवून ठेवले आहेत. सुट्टी आहे म्हणून त्याला पाच दिवस डांबून ठेवण्यात आले आहे. झोनल अधिकाऱ्याचा बॉलिवूडमध्ये वेस्टेड इंट्रेस्ट आहे. त्यांची पत्नी सिनेमात काम करते, मॉडल आहे. हा माणूसही कलाकारासारखं काम करतो. हा सर्व त्यांचा दुराग्रह आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. समीर वानखेडे भाजपच्या कार्यकर्त्यासारखे काम करतात. वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि आर्यनला जामीन मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com