Supporters of Ravikant Tupkar during Aggressive Agitation In Buldhana.
Supporters of Ravikant Tupkar during Aggressive Agitation In Buldhana.Sarkarnama

Buldhana Ravikant Tupkar : पोलिसांच्या कारवाईनंतर बुलडाण्यात संतप्त पडसाद

Aggressive Agitation : रविकांत तुपकरांच्या समर्थकांकडून फाशी घेण्याचा प्रयत्न, टायर जाळत निषेधही
Published on

Farmer's Protest : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना शनिवारी (ता. 25) बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. या घटनेचे पडसाद शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उमटले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीसह आंदोलन करण्यात आलं. एका समर्थकानं बुलडाणा पोलिस ठाण्यासमोरच फाशी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या समयसूचकतेमुळं अनर्थ टळला.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुपकर यांनी 20 नोव्हेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चा काढला होता. मोर्चात त्यांनी 29 नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्या इशारा दिला होता. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही तुपकर आंदोलनावर ठाम होते. त्यामुळं त्यांना ताब्यात घेण्यात आलं. (Aggressive Agitation By Supporter's of Farmer's Leader Ravikant Tupkar After His Detention By Buldhana Police)

Supporters of Ravikant Tupkar during Aggressive Agitation In Buldhana.
Buldhana Ravikant Tupkar : 'यज्ञजा... घाबरायचं नाही, शेतकऱ्यांची लढाई लढायचीय !'

मुंबईतील तुपकरांच्या आंदोलनाला अद्याप चार दिवस असले तरी त्यांच्या आंदोलनाबाबतचा मागील सर्व अनुभव पाहता त्यांना पोलिसांनी आतापासूनच ताब्यात घेतलंय. सध्या त्यांना बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं तुपकर समर्थक बुलडाणा शहर पोलिस ठाण्याबाहेत गोळा झाले आहेत. समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनादरम्यान नितीन राजपूत नावाच्या एका समर्थकानं पोलिस ठाण्यासमोरच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं खळबळ उडाली.

पोलिसांनी तातडीनं धाव घेत राजपूत यांना ताब्यात घेतलं. सध्या बुलडाणा शहर पोलिस ठाण्यासमोर तणावाचं वातावरण आहे. त्यामुळं शहरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही येथे एक शेतकरी आत्महत्या करण्यासाठी टॉवरवर चढला होता. तुपकर यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाभरात आंदोलन सुरू झालय. रास्ता रोको, टायर जाळत निषेध करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चिखली तालुक्यातील पेठ व त्यापाठोपाठ खामगाव तालुक्यातील अनेक गावांत रस्त्यांवर टायर जाळण्यात आले आहेत. वाहतूकही थांबविण्यात आली आहे. बुलडाण्यातून पोलिस अधीक्षक सुनील कडासने हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. खामगाव तालुक्यात अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, पोलिस उपअधीक्षक विनोद ठाकरे यांनी बंदोबस्तात वाढ केलीय. उर्वरित जिल्ह्यावर अपर पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी नजर ठेवत आहे. बुलडाण्याचे पोलिस उपअधीक्षक गुलाबराव वाघ, देऊळगावराजाचे पोलिस उपअधीक्षक अजय मालवीय, मेहकरचे उपअधीक्षक प्रदीप पाटील, मलकापूरचे उपअधीक्षक देवराम गवळी त्यांच्या संपर्कात आहेत.

रविकांत तुपकर यांनी शनिवारी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांना दुपारपर्यंत आंदोलन रद्द करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, मंत्रालयात आंदोलन करणारच या भूमिकेवर ते ठाम राहिल्यामुळं अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांना ताब्यात ठेवणार असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्ट केलं.

Edited by : Prasannaa Jakate

Supporters of Ravikant Tupkar during Aggressive Agitation In Buldhana.
Buldhana Ravikant Tupkar : मंत्रालयात मंत्री काय अंडी उबवायला बसलेत का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com