AIIMS Hospital News : नागपूर एम्समधील कर्मचाऱ्यांची अभिनव क्लुप्ती, रुग्णांनी आणलेले इंजेक्शन पुन्हा त्याच फार्मसीमध्ये !

Nagpur : येथील कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्याचा मार्ग शोधलाच.
Naggpur AIIMS Hospital.
Naggpur AIIMS Hospital.Sarkarnama
Published on
Updated on

The injection purchase scam News : भ्रष्ट्राचार करण्यासाठी कोण काय युक्ती शोधून काढेल, याचा नेम नाही. पण एम्ससारख्या संस्थेमध्येही असा प्रकार होईल, याची कल्पना कुणालाही नव्हती. पण येथील कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्याचा मार्ग शोधलाच. अखेरीस दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. (Eventually, two employees were arrested)

मेडिकलमध्ये शुल्क घोटाळ्यापाठोपाठ मिहान परिसरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) एमआरआय काढताना आवश्यक असलेल्या ‘कॉन्ट्रास्ट’ इंजेक्शन खरेदीचा घोटाळा पुढे आला आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

एमआरआय सांगण्यात आलेल्या तीन रुग्णांकडून तीन इंजेक्शन मागवण्यात येत होते. मात्र एक इंजेक्शन तिघांना देण्यात येत होते. उर्वरित दोन इंजेक्शन त्याच फार्मसीमध्ये परत करण्यात येत होते, असा हा गैरप्रकार उघडकीस आला. हे कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

राज्यात नुकतेच सर्वोत्तम सेवेसाठीचे ‘एनएबीएच’ मानांकन एम्सला प्राप्त झाले आहे. मात्र नागपूर (Nagpur) एम्समध्ये रुग्णांना लुबाडण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांकडून अभिनव अशी क्लुप्ती वापरली जात होती. एमआरआय काढण्यासाठी रुग्णांकडून ‘कॉन्ट्रास्ट’ मागवण्यात येते. एम्समध्ये रुग्णांची वाढती संख्या बघता रेडिओलॉजी विभागात काही कर्मचाऱ्यांनी कमाईचा नवीन फंडा शोधून काढला.

Naggpur AIIMS Hospital.
Nagpur Crime News : पुण्यात कोयता गॅंग तर नागपुरात ‘पिस्तुल राज’ची दहशत !

एका दलालाची मदत कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. रुग्ण ‘एमआरआय’साठी आल्यावर कर्मचारी त्याला बाहेरून ‘कॉन्ट्रास्ट’ हे इंजेक्शन आणायला सांगत होते. एम्समधील अमृत फार्मसीत एक व्यक्ती सलग तीन वेळा कॉन्ट्रास्ट औषध व त्याचे देयक घेऊन ते परत करण्यासाठी वेगवेगळ्या दिवशी आला. यामुळे संशय आला.

त्यांनी त्याचा मागोवा घेतला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने संबंधिताला पकडून झडती घेतली असता त्याच्याजवळ तीनहून अधिक इंजेक्शन सापडले. मोबाईल फोनची तपासणी केली असता, तो एम्समधील एका कर्मचाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे आढळले व हा गैरप्रकार पुढे आला.

Naggpur AIIMS Hospital.
Nagpur ZP News : गडकरी, बावनकुळेंची सूचना झुगारून रचले ग्रीन जीमचे षडयंत्र !

कॉन्ट्रास्ट कशासाठी ?

कॉन्ट्रास्ट इंजेक्शन दिल्यानंतर एमआरआयची सूक्ष्म प्रतिमा अतिशय स्पष्ट दिसते. विशेष असे की, काही रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यापासूनही बचाव होतो, निदान अचूक होत असल्याचे रुग्णाला सांगितले जायचे. रुग्णाने इंजेक्शन आणल्यावर ते नंतर ते दलालाच्या माध्यमातून औषध दुकानात परत करून पैसे घेतले जायचे. हा प्रकार एम्स (AIIMS) प्रशासनाच्या निदर्शनात आला त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

दरम्यान या प्रकरणातील रजत राकेश गिलडिया (२६) हा कंत्राटी कर्मचारी आणि सोबीत उपरेती या दोघांना पोलिसांनी (Police) अटक केल्याची माहिती सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम परदेशी यांनी दिली. एम्सच्या कंत्राटी कर्मचाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी एम्सचे विजयकुमार नायक यांच्याशी संपर्क केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com