Ajit Pawar : डीपीसीच्या निधीवरून भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस

BJP- NCP Political Issue : अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असा अंदाज बांधला जात होता. प्रत्यक्षात उलट झाले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : लोकसभेत पराभवाचा फटका बसल्यानंतर भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांना जिल्हा नियोजन समितीचा निधी देण्यास थेट नकार देण्यात येत असल्याने मोठा असंतोष निर्माण झाला आहे. अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असा अंदाज बांधला जात होता. प्रत्यक्षात उलट झाले आहे.

भाजपच्या (BJP) उमेदवारांना राष्ट्रवादीने तर राष्ट्रवादीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मदत केली नसल्याचे आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकमेकांवर संशय व्यक्त केला जात आहे. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर संघाच्यावतीनेसुद्धा राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती असे वक्तव्य केले जात आहे. एकूणच भाजपच्या पराभवाचे खापर अजित पवार यांच्या टीमवर फोडले जात आहे.

Ajit Pawar
Mahayuti Dispute : मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदार महायुतीतून बाहेर पडणार; नागपूरच्या बड्या नेत्याचा दावा

विदर्भात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही. जे काही पदाधिकारी शरद पवार यांना सोडून गेले त्यांची अवस्था गोंधळलेली झाली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांनी राजकीय लाभाचे गणित डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्यासोबत घरोबा केला. जिल्हा नियोजन समितीवर चार दोन सदस्य नेमून राष्ट्रवादीची बोळवण करण्यात आली. आता सरकारचा कार्यकाळ संपायला आता अवघे पाच ते सहा महिने शिल्लक राहिली आहेत

सर्वांच्याच आशा मावळत चालल्या आहेत. नागपूरमध्ये डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्या बैठकीत निधी वाटप झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सर्व शांत बसले होते. आगामी वर्षांच्या बजेटमध्ये आपल्या मतदारसंघासाठी निधी मिळावा याकरिता काही सदस्यांनी अर्ज केले आहेत.

Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule : पराभवानंतर बावनकुळे उतरले मैदानात; विधानसभा जिंकण्याच्या दिल्या टिप्स

त्यांना तुम्हाला निधी मिळणार नाही असे थेट भाजपच्याच काही नेत्यांनी कळवल्याचे समजते. हाच पवित्रा पुण्यामध्ये अजित दादांनी घेतला असल्याचे समजते. त्यावर नागपूरमध्ये राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले जात असल्याचे कळते. त्यामुळे मोठी धुसफूस सुरू झाली आहे. विधानसभेपर्यंत राष्ट्रवादी युतीत राहिल की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com