चेतन व्यास
Wardha News : नेत्यांच्या सभा आणि कार्यक्रमानंतर जेवणावळी हे आजच्या राजकारणाचे समीकरणचं बनले आहे. राज्यातील सत्तासंघर्षामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने कार्यकर्त्यांना बऱ्याच दिवसांपासून जेवणावळीची प्रतीक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या मेळाव्यानंतर ठेवण्यात आलेल्या जेवणाचा मात्र पुरता फज्जा उडाला. ज्या कार्यकर्त्यांच्या हाती लागलं, त्यांनी भांडी रिकामी होईपर्यंत ताव मारला. मात्र काहींच्या हातात रिकाम्या प्लेटाच राहिल्या, त्यांनी शिव्या हासडत नेत्यांचा उद्धार केला. (Ajit Pawar group of NCP Melava in Wardha)
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वर्ध्यातील दादाजी धुनिवाले सभागृहात खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत परिवर्तन मेळावा पार पडला. या मेळाव्यात नियोजनशून्यतेमुळे जेवणावळीतील ओढाताण चांगलीच गाजली. मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांसाठी जेवणाचा बेत होता.
मेळावा संपल्यानंतर जेवणाच्या ठिकाणी एकच झुंबड होऊन अक्षरश: प्लेटांची ओढाताण झाली. कार्यकर्त्यांनी जेवणाकरिता घेतलेला हा आक्रमक पवित्रा पाहून कॅटर्सच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः स्टॉल सोडले. त्यानंतर त्या स्टॉलचा ताबा या कार्यकर्त्यांनी घेऊन भांडी रिकामी होईपर्यंत गोंधळ घातला.
कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा जिलेबीवर ताव मारला. सर्वांनी शब्दशः प्लेट भरून जिलेबी घेतली. त्यामुळे काही वेळातच जिलेबी संपली आणि कार्यकर्ते मसाला भाताकडे वळले, तर काहीजण कडीकडे. या गोंधळात कुणाचे पोट भरले, तर कुणाला उपाश्यापोटीच घरी परतावे लागले. काहींच्या हातातील प्लेटा रिकामाच्या राहल्याने त्यांनी या मेळाव्याकरिता बोलावलेल्या नेत्यांना शिव्या हासडत, जलेबी अन् मसाले भाताचा ‘उदोउदो’ केला. बाहेर गावावरून आलेल्या काही कार्यकर्त्यांना उपाशीपोटीच जावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.