Ajit Pawar News : अजित पवार आजच्या नागपुरातील सभेत भाषण देणार नाहीत, 'हे' आहे कारण !

Nagpur : महाविकास आघाडीच्या आम्ही नेत्यांनी एकत्र बसून ठरविले होते.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

ठरले त्या दिवसापासूनच महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा चर्चेत राहिलेली आहे. आधी दर्शन कॉलनीचे मैदान देण्यावरून, नंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येणार की नाही आणि त्यानंतर माजी मंत्री डॉ. नितीन राऊत येणार नाहीत, आदी चर्चांनी ही सभा राजकीय वर्तुळात केंद्रबिंदू राहिली.

आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार नागपुरात दाखल झाले. पण आजच्या सभेत बोलणार नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या आम्ही नेत्यांनी एकत्र बसून ठरविले होते की, राज्यात महाविकास आघाडीच्या सहा ते सात सभा घ्यायच्या याची सुरुवात संभाजीनगर मधून झाली आज दुसरी सभा नागपूरला होते आहे.

या सभेच्या बाबतीत मिडिया वेगवेगळ्या बातम्या चालवीत आहे. पण सगळी माहिती घेऊन बातम्या चालविल्या तर बरं होईल. सभेत प्रत्येक पक्षाचे दोन मान्यवर भाषण करतील, असं आधीच ठरलं होतं. आजच्या सभेत स्थानिक नेते म्हणून अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलणार आहेत. मी संभाजीनगरमध्ये बोललो त्यामुळे आजच्या सभेत बोलणार नाही. काँग्रेसकडून कोण दोन नेते भाषण करतील मला माहिती नाही. कारण हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे, असे अजित पवार म्हणाले.

कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री आमदार सुनील केदार, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि कोण बोलतील, हे मला माहिती नाही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. सभा आटोपशीर व्हावी, जास्त लांब होऊ नये, कार्यकर्त्यांना व्यवस्थित ऐकता यावं हा त्यामागचा हेतू आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही होम पीच आहे. अगदी तशीच अनिल देशमुख आणि सुनील केदार यांचीही होम पीच आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar News :''अजित पवारांनी आम्हांला सपोर्ट केला तर...'', शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारमधील नेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) बाबतीत बोलायला लागले आहेत. याबाबतीत विचारले असता, सर्व नेत्यांचे प्रेम माझ्यावरच का उतू जातंय, हेच मला कळत नाहीये गुलाबराव पाटील, (Gulabrao Patil) दादाजी भुसे, उदय सामंत (Uday Samant) हे आधी बोलले या सगळ्यांचा माझ्याबद्दलचे प्रेम का उतू जाताय हे कळायला मार्ग नाही. माझ्या बाबतची भूमिका मी मांडली आहे. या सभेला अजित पवार येणार की नाही, भाषण करणार की नाही. कुठे बसणार या चर्चा माध्यमांवर सुरू आहे. पण आमचं हे सगळं आधीच ठरलेलं आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com