Ajit Pawar News :''अजित पवारांनी आम्हांला सपोर्ट केला तर...'', शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

Maharashtra Politics : ''...आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस नक्कीच येतील!''
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींची डिग्री, ईव्हीएमचा मुद्द्यांसह अदानी प्रकरण यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या विरोधात रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त दिली होती.

तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा अजित पवार(Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याचा खळबळजनक दावा, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्यातून ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अजित पवारांचं नाव वगळण्यात आल्यानंतर तर या चर्चांनी पुन्हा एखदा जोर धरु लागली आहे. याचवेळी आता शिवसेनेच्या नेत्यानं सूचक वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar
Anna Hajare News : ...तर केजरीवालांना शिक्षा झालीच पाहिजे; अण्णा हजारेंचे कठोर बोल!

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केलं. शिवतारे म्हणाले,अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केल्यानंतर पुरंदरच काय तर महाराष्ट्राचा राजकारण सोप्प होईल असं विधान करत राज्याच्या राजकारणात एखच खळबळ उडवून दिली आहे. चांगले लोक एकत्र आल्यावर देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस नक्कीच येतील असंही शिवतारे यावेळी म्हणाले.

ईडीचं दोषारोपपत्र, दमानियांच्या दाव्यावर अजित पवार म्हणाले..

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात ईडीने क्लीनचिट दिल्याच्या वृत्तावर अजित पवार म्हणाले, ''मला आणि सुनेत्रा पवार यांना कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत तथ्य नाही. ती चौकशी सध्या सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळाली नाही. ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला समजले नाही. मात्र, मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट अद्याप मिळालेली नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Supreme Court : सत्तासंघर्षाचा निकाल कधी? सर्वोच्च न्यायालयातील वकिलाने सांगितली तारीख अन् 'या' शक्यता...

दरम्यान, अजित पवार यांनी अंजली दमानियांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, ''एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे'' असा टोला लगावत त्यांनी दमानियांच्या वक्तव्यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे यांची सूचक प्रतिक्रिया

अंजली दमानियांनी केलेल्या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ''अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचे ट्वीट मी वाचलेले नाही. मात्र, त्यांनी काही लिहिले असेल, तर त्यांना तो अधिकार आहे.

Ajit Pawar
Uttar Pradesh : मोठी बातमी! गँगस्टर अतिक अहमद अन् अश्रफ अहमदचा गोळीबारात मृत्यू

पावसाच्या उदाहरणासह सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले. ''१५ मिनिटांनी इथे पाऊस पडेल का? याचे उत्तर माझ्याकडे नाही. आत्ता उन आहे हे मी सांगू शकते. मात्र, १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचे उत्तर माझ्याकडे नाही'' असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com