Ajit Pawar News in Marathi : राष्ट्रवादीच्या कार्यालयात उद्या बैठक, मात्र शहराध्यक्ष ‘प्रतिसाद देत नाहीत’ !

Nagpur : शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांनी प्रतिसाद दिला नाही.
Ajit Pawar, Sharad Pawar and Duneshwar Pethe
Ajit Pawar, Sharad Pawar and Duneshwar PetheSarkarnama
Published on
Updated on

NCP news in maharashtra : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून राज्यातील कार्यकर्ते संभ्रमात आहे. नागपुरातही अजित पवार यांचे बव्हंशी समर्थक ‘नॉट रिचेबल’ आहेत. शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (There is a picture of division among party leaders in the city)

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केल्याने शहरातील पक्ष नेत्यांत फूट पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. यास नागपुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारीही अपवाद नाही. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे अद्यापही तळ्यात मळ्यात असल्याचे दिसत आहे.

शहरात अजित पवार यांचे समर्थक फारसे नसले तरी जे आहेत, ते प्रभावशाली आहेत. यात प्रशांत पवार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांचा समावेश आहे. यासंदर्भात दोघांशीही फोनवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रशांत पवार यांचा तर फोनच लागला नाही. राजकीय भूकंपाने शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठेही संभ्रमात असल्याचे दिसून आले.

पेठे हे नागपूरच्या बाहेर असल्याची माहिती आहे. दुनेश्वर पेठे यांनी काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार आयोजित केला होता. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहे. आता प्रफुल्ल पटेलही अजित पवारांसोबत सामील असल्याने ते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसाठी ही घटना अनपेक्षित असल्याचे दिसत आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar and Duneshwar Pethe
Ajit Pawar Big Step : काॅंग्रेस नेते म्हणतात, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे हे अखेरचे अधिवेशन !

अचानक उद्‍भवलेल्या या परिस्थितीमुळे अनेकांना बोलणेही अवघड झाले आहे. त्यातच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. आज साताऱ्यापासून ते पवारांच्या सोबत आहेत. महाराष्ट्रभर राष्ट्रवादीचे काम करणार असल्याचे देशमुखांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनीही शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले.

गणितच बिघडले..

पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्व नागपूर मतदारसंघावर दावा करण्याचे ठरविले होते. तसा प्रयत्न पूर्व नागपुरातील नेत्यांचा सुरू होता. परंतु आता अजित पवार भाजप व शिंदे गटासोबत गेल्याने या मतदारसंघातून इच्छुक असलेल्यांचे गणितच बिघडल्याचे चित्र आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar and Duneshwar Pethe
Supriya Sule v/s Ajit Pawar ; पक्ष फुटल्यावर सुळे पहिल्यांदाच समोर | Jayant Patil | Jitendra Awhad

५ तारखेला पदाधिकाऱ्यांची बैठक..

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची ५ जुलैला मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी नागपुरातून (Nagpur) कोण जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्या शहर राष्ट्रवादीची बैठक..

शरद पवार (Sharad Pawar) यांनी ५ तारखेला बोलावलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी उद्या (ता. ४ जुलै) बैठक आयोजित केली आहे. सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांच्या अध्यक्षांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com