Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : ‘त्या’ प्रश्‍नावर अजित पवारांनी घेतली पत्रकारांची फिरकी, म्हणाले…

Prakash Ambedkar : त्यांनी काय करावं, हा त्यांचा निर्णय आहे.

Ajit Pawar on Nana Patole's Banner of CM : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं आमच्याबद्दल नियमित वेगळं मत असल्याचा प्रकर्षाने जाणवतं. मागील वेळीसुद्धा आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी यश आलं नाही. त्यांनी काय करावं, हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना म्हणालो महाविकास आघाडीत वंचितसोबत तुमचं जमत असेल तर जमवून घ्या, आम्ही सोबत आहोत, असे अजित पवार म्हणाले. (Apart from the chief ministership, four more ministerial posts were held)

आज (ता. ४) सकाळी नागपुरात अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, २००४ सालचा अपवाद वगळता ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री असतो, त्या घटनेला आता १९ वर्षे झालेले आहेत. त्यावेळी जागा जास्त आल्यावरसुद्धा आम्ही मुख्यमंत्रिपद न घेता, चार मंत्रिपद अधिक घेतले होते.

लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही चाचपणी करतो आहोत. बाकी या बातम्या मीडियातूनच आम्ही ऐकलेल्या आहेत. नवीन चेहऱ्यांचा आम्ही विचार करत आहोत. नवीन चेहरे पुढे येत आहे का, महिलांमधून कुणी पुढे येऊ शकतं का. उद्या (ता. ५) पुण्यामध्ये बैठक घेऊन चर्चा करणार आहोत. तसेच नंतर मुंबईमध्येसुद्धा इतर ठिकाणच्या जागांसाठी आम्ही चर्चा करणार आहोत, असे पवार म्हणाले.

पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आमचं लक्ष लोकसभेच्या निवडणुकीवर केंद्रित आहे. जो लोकसभेमध्ये चांगलं काम करेल, रिझल्ट देईल, त्यांचा आम्ही आमदारकीसाठी विचार करू. त्यासाठी इच्छुकांनी अधिक मेहनत घेऊन काम करणे गरजेचे आहे. जो अधिकाधिक लोकांमध्ये राहून काम करेल, त्याला प्रतिसाद नक्कीच मिळेल आणि अशांचाच विचार करण्यात येईल.

Ajit Pawar
Ajit Pawar News : आमच्यासारख्या लोकांचे नाव घेतले की त्यांची बातमी होते, पण विश्‍वास ठेवू नका !

संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल विचारले असता, त्यांचा प्रवक्त्यांनी काय बोलावे, हा त्यांचा विषय आहे, कसे वक्तव्य करून लोकांमध्ये जावे याचासुद्धा त्यांनाच विचार करायचा आहे. एक मात्र नक्की सांगतो, आमच्यात वाद नाही. संजय राऊत मोठे नेते आहेत. मला वाईट वाटत नसेल तर तुम्हाला का वाईट वाटते, मी माझ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगतो. तुम्ही काळजी करू नका, असे अजित पवार म्हणाले.

कुण्या नेत्याचे भावी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याचे पोस्टर लागले, तर तुम्हाला का त्रास होतो? तुमच्यामध्ये किती भावी संपादक आहे, त्याचं आत्मपरीक्षण करा, असे म्हणत अजित दादांना पत्रकारांचीच फिरकी घेतली. मुख्यमंत्रिपद हे आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतं, असे बॅनर्स लावून काही होत नसतं, असे पवार म्हणाले.

Ajit Pawar
Ajit Pawar News : रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देऊन प्रश्‍न सुटणार नाही, पण...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा उद्या, सोमवारी (ता. ५) वाढदिवस आहे. त्या निमित्त नानांच्या कार्यकर्त्यांनी नागपूर (Nagpur) शहरातील अजनी परिसरात शुभेच्छा बॅनर्स लावलेले आहेत. या बॅनरवर नाना पटोलेंचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘शेतकरी पुत्र, कष्टकऱ्यांचे नेते नाना पटोले’ असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. याबाबत आज अजित पवारांना (Ajit Pawar) विचारले असता, त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com