Ajit Pawar News : रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देऊन प्रश्‍न सुटणार नाही, पण...

Lal Bahadur Shastri : तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता.
Ajit Pawar and Ashvini Vaishnav
Ajit Pawar and Ashvini VaishnavSarkarnama

Ajit Pawar on Orisa Railway Accident : ओरिसामध्ये भीषण अपघात झालेला आहे. अशा अपघाताच्या प्रसंगी तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अशा घटनांची जबाबदारी घेऊन पाच रेल्वेमंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. मग विद्यमान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा का देऊ नये, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. (Why should Railway Minister Ashwini Vaishnav not resign?)

नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी शिबिरासाठी आज (ता. ३) आले असता अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ओरिसामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आणि तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर धडकल्या. अडीचशेपेक्षा जास्त प्रवासी मृत्युमुखी पडले आणि हजारावर जखमी झाले, त्यांचा आकडाही अद्याप पुढे आलेला नाही. आतापर्यंत देशात अनेक रेल्वेमंत्री होऊन गेले. लाल बहादुर शास्त्री यांच्यानंतर ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यासह पाच मंत्र्यांनी मोठ्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिलेले आहेत.

सध्याच्या रेल्वेमंत्र्यांनीही अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. एक गोष्ट मलासुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे की, राजीनामा देऊन प्रश्‍न सुटणार नाही. परंतु मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर खालच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते. यामध्ये जी काही सिग्नलची व्यवस्था असते. त्यामध्ये चालढकल झाल्याने हा अपघात झाला आहे. देशात बुलेट ट्रेन सुरू करण्याची तयारी सुरू आहे. वंदे भारतच्या काही रेल्वे सुरू झाल्या आहेत. आजही मुंबई ते गोवा (Goa) वंदे भारत (India) एक्सप्रेस सुरू होणार होती. परंतु या घटनेमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.

काही ठिकाणी रेल्वे रुटचे खासगीकरण करण्यात आले आहे, तो रेल्वे खात्याचा अधिकार आहे. निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, त्यांचा काहीही दोष नव्हता. सिग्नलकडे नीट लक्ष न दिल्या गेल्याने हा अपघात झालेला आहे. तंत्रज्ञानात येवढी क्रांती झालेली आहे की, आता विमान येवढेच काय तर कार चालवण्यासाठीही चालकाची गरज नसते. कॉम्प्युटरला फिडिंग केल्यानंतर विमान किंवा कार चालते. पण या अपघातात जे निष्पाप जीव गेले, त्यात केंद्र सरकार (Central Government) आणि रेल्वे खात्याचे अपयश आहे, असा घणाघाती आरोप पवारांनी केला.

Ajit Pawar and Ashvini Vaishnav
Ajit Pawar News : काहींना लगेच राग येतो, त्यामुळं ज्याचं त्याला लखलाभ…

या अपघाताची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे आणि त्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होऊ देता चौकशी झाली पाहिजे. कुणालाही पाठीशी न घालता अपघाताची वस्तुस्थिती जनतेच्या समोर आली पाहिजे, अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com