Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : अजितदादा आग्रही असलेल्या खात्याबाबत लवकरच निर्णय होणार ?

Maharashtra Cabinet : शुक्रवारी रात्री खातेवाटपाबाबत खलबतं होण्याची माहिती
Published on

NCP Crisis And Maharashtra Political : राज्यात एकाच वर्षात दुसऱ्यांदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवारांसह नऊ आमदारांनी थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे एकीकडे शिंदे गटात अस्वस्थता पसरलेली असतानाच आता खातेवाटपावरुनही सरकारमध्ये तिढा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Political News)

आता अजित पवार अर्थमंत्रालयासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये पवारांकडे अर्थ खाते होते. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळण्यास त्रास होत असल्याचा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला होता. त्यामुळे आता पुन्हा अजित पवारांना अर्थ खाते देण्यास त्यांनी नाखुशी दर्शवली आहे. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Assembly Monsoon Session: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; तीन आठवडे चालणार अधिवेशन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन पाच दिवस उलटले आहेत. मंत्रिमंडळाची बैठकही खातेवाटपाविनाच पार पडली. दरम्यान, शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी भाजपची बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. यावेळी अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्यासाठी अजित पवार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खाते का द्यावे, या मगची कारणे पवार होणाऱ्या बैठकीत देण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Manisha Kayande On Sushma Andhare : नकली हिंदुत्ववाले ठाकरे गटाचा चेहरा; मनिषा कायंदेंचा अंधारेंवर निशाणा

बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटात अनेक आमदार आले आहे. त्यांचा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी अर्थ मंत्रालयाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पवार यांनी केली आहे. त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना निर्णय घ्यायचा आहे. दरम्यान, याबाबत पवार-शिंदे आणि फडणवीस यांची रात्री बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com