Ajit Pawar News : "संभाजी महाराज 'धर्मवीर' नव्हे, 'स्वराज्यरक्षक'च!"

Ajit Pawar News : संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही.
Ajit Pawar, CM Eknath Shinde Latest News
Ajit Pawar, CM Eknath Shinde Latest NewsSarkarnama

Ajit Pawar News : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समारोपाच्या भाषणानंतर, विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिवेशनातील अखेरच्या भाषणात वढू येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ नामकरणावर ही भूमिका मांडली. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही, तर स्वराज्यरक्षक आहेत, असे पवार म्हणाले.

Ajit Pawar, CM Eknath Shinde Latest News
Sarkarnama Impact : पन्नालाल सुराणांकडे लाच मागणारे अधिकारी बडतर्फ होणार ; फडणवीसांचे आदेश!

"छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा," असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar, CM Eknath Shinde Latest News
Narendra Modi News : अमित शाहंच्या मध्यस्थीनंतर आता पंतप्रधान मोदींचा बेळगाव दौरा : एकीकरण समिती कैफियत मांडणार?

तुम्ही सिन्नरला दौऱ्यावर असताना कुठे गेला होतात, आम्हाला त्याबद्दल माहिती नाही. मात्र तुम्ही त्या ठिकाणी गेला नसता, तर पुढचा वाद झालाच नसता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाहीत, असं चित्र उभं राहिलं असतं. राष्ट्रपुरूषांविरोधात बोलल्यापंतर तुम्ही काहीच बोलला नाही.राष्ट्रपुरूषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याबाबत तुम्ही निषेधही करत नाही. राज्यात पोलिसांची २० हजार पदं रिक्त आहेत, या मुद्द्यावरही अजित पवारांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com