Grampanchayat Election Restuts Analysis : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत आपलाच पक्ष ’नंबर वन’असल्याचा दावा विविध पक्षांची नेतेमंडळी करीत आहेत. त्यामुळे ज्यांनी पॅनेल तयार करून विजय खेचून आणला, त्यांच्या आनंदावर विरजण घातले जात आहे. तर, सरपंचांची पळवापळवी झाल्याच्या घटनांमुळे निवडणुकीतील रंगतही वाढली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे 93 ग्रामपंचायतीमधील 93 सरपंच व 611 सदस्यांसाठी रविवारी (ता.18) निवडणूक पार पडली. मंगळवारी (ता. 20) मतमोतजणी झाली. सरपंच (Sarpanch) लोकांमधून निवडला गेल्याने अनेक ग्रामपंचायतींवर सरपंच एका पक्षाचा तर सदस्य दुसर्या पक्षाचे असे चित्र दिसून आले. निकाल लागताच नेत्यांमधील अहमहमीका जागी झाली. त्यांनी ग्रामपंचायतींवर आपले कसे वर्चस्व आहे, हे सिद्ध करण्यासाठी आकडेमोड सांगणे सुरू केले. आपल्या पक्षाचे सदस्य विजयी झाल्याचे दावे-प्रतिदावे केले. या निवडणुकीत (Election) मतदारांनी तरुण नेतृत्वावर विश्वास टाकल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील मतदारांनी भाजपला कौल दिल्याचे स्पष्ट झाले. त्याखालोखाल काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. यावेळी काँग्रेसचा परफॉर्मन्स सुधारल्याचे चित्र दिसून येत असून 21 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे. त्याखालोखाल 15 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय संपादन केला आहे. तर ठाकरे गटाने 10 व शिंदे गटाने 12 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता काबीज केल्याचा दावा केला आहे. मनसेने एका ठिकाणी खाते उघडले असून अपक्षांनी दहा जागांवर विजय मिळविला आहे. सरपंच कुण्या पक्षाचा यावरून ही आकडेवारी सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात निवडणुकीत कोणत्याही पक्षाचे नेते मैदानात उतरले नव्हते. ना कुण्या पॅनेलला रसद पुरविली. मात्र,विजयाचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले आहे. त्यात आमदारांसह खासदारांचाही समावेश आहे.
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात फिप्टी-फिप्टी..
जिल्ह्यात सर्वच नेत्यांनी आपापल्या भागात आपले वर्चस्व सिद्ध केले. दारव्हा-नेर-दिग्रस तालुक्यात पालकमंत्री संजय राठोड यांचे वर्चस्व असल्याचा दावा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून केला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही 50 टक्के जागा आम्ही जिंकल्याचा प्रतिदावा केला आहे. दिग्रस तालुक्यातील पाचपैकी सेवानगर, लिंगीवाई, वाईलिंगी, फेट्री या चार ग्रामपंचायतींवर पालकमंत्री संजय राठोड यांचे वर्चस्व तर एक ग्रामपंचायत अपक्षाकडे असल्याचा दावा आहे.
एकाच उमेदवाराचा दोन पक्ष कार्यालयात गौरव..
दारव्हा तालुक्यातील चोरखोपडी येथील सरपंचपदाच्या उमेदवाराने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. या विजयानंतर काँग्रेस पक्ष कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, काही वेळानंतर त्याच विजयी उमेदवारांचा बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयातही सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पक्षात प्रवेश घेतल्याचा दावा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.