तुकाराम मुंढेंसह महापालिका येणार अडचणीत? अजित पवारांनी घेतली गंभीर दखल

आमदार ठाकरे यांनी या घोटाळ्यामुळे महापालिका बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.
Ajit Pawar, Tukaram Munde

Ajit Pawar, Tukaram Munde

sarkarnama

नागपूर : नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा आणि आयुक्त असताना तुकराम मुंढे (Tukaram Munde) यांच्या कार्यकाळात कोरोना निधीची केलेली उधळपट्‍टी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांनी विधानसभेत उपस्थित केली. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महापालिका बरखास्त होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

आमदार ठाकरे यांनी या घोटाळ्यामुळे महापालिका बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे. दरम्यान, २० वर्षांपूर्वी नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असताना क्रीडा साहित्य घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात अनेक नगरसेवकांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. हे प्रकरण आजही न्यायालयात सुरु आहे. त्यानंतर आता स्टेशनरीचा ६५ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे. ही रक्कम फक्त आरोग्य विभागातील स्टेशनरीचीच आहे. जन्म-मृत्यू, स्थापत्य, सामान्य प्रशासन आदी विभागातही स्टेशनरी खरेदी केली जाते. पुरवठादार मनोहर साकोरे याने ६७ लाख रुपये परत केले आहेत. इतर विभागातील देयकांकरिता ५१ लाखांचे चार धनादेशसुद्धा जमा केले होते.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar, Tukaram Munde</p></div>
सकाळी राणेंसोबत बैठक अन् दुपारी अजितदादा स्टेजवरूनच म्हणाले , महाभाग!

यापैकी सगळे धनादेश बाऊंस झाले आहेत. शहरातील महापालिकेच्या १० झोनमध्येसुद्धा स्टेशनरी खरेदी केली जाते. मनोहर साकोरे नावाच्या पुरवठादाराच्या वेगवेगळ्या नावाने सात फर्म आहेत. त्यांच्या माध्यमातून तो महापालिकेला स्टेशनरी पुरवठा करतो. तत्पूर्वी तुकाराम मुंढे आयुक्त असताना कोरोना काळात कुठल्याही निविदा आणि कोटेशनशिवाय मोठ्‍या प्रमाणात साहित्य खरेदी केले होते. ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले पिंटू झलके यांनीसुद्धा कोरोना निधीत अनियमितता झाली असून याची चौकशी करण्याची मागणी केली होती.

आयुक्त मुंढे यांनी कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी कळमेश्वर रोडवरील राधा स्वामी सत्संग मंडळाच्या जागेत पाच हजार खाटांचे रुग्णालय उभारले होते. या ठिकाणी शेड उभारून, बेड, गाद्या, अंघोळीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले होते. मात्र, दुसरी लाट आल्यानंतरही या उभारलेल्या रुग्णालयाचा वापर केला नाही. येथील साहित्य कुठे गेले असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रुग्णालयात सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. विशेष म्हणजे याच राधा स्वामी सत्संग मंडळाला मुंढे यांनी कोरोना रुग्णांच्या भोजनाचे कंत्राट दिले होते.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar, Tukaram Munde</p></div>
गुड गव्हर्नन्स! मोदी सरकारची महाराष्ट्राच्या पाठीवर थाप

कोरोनाकाळात रुग्ण आढळलेल्या वस्त्यांना बंद केले होते. कन्टोनमेंट झोन करण्यासाठी साहित्य खरेदी केले होते. त्यावर पाच कोटी रुपये खर्च झाले आहे. हासुद्धा एक मोठा घोटाळा असल्याचे ठाकरे यांनी विधानसभेत सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या सर्व घोटाळ्याची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती नेमावी आणि महापालिका बरखास्त करून भ्रष्टाचाराचे पाळेमुळे खणून काढावे, अशी मागणी आमदार ठाकरे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com