Ajit Pawar : अजितदादांना अधिकाऱ्याच्या मिशीची भुरळ; स्टेजवर बोलवले अन् म्हटले,'वा काय मस्त...'

Ajit Pawar appreciating BDO Sanjay Puppalwar: अजित पवार यांनी एका कार्यक्रमाता प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अधिकाऱ्याला स्टेजवर बोलावून घेतले. अधिकाऱ्यांच्या मिशीच्या हटके स्टाईल पाहून अजितदांनी देखील त्यांचे कौतुक केले.
Ajit Pawar appreciating BDO Sanjay Puppalwar’s mustache during an event.
Ajit Pawar appreciating BDO Sanjay Puppalwar’s mustache during an event.sarkarnama
Published on
Updated on

संदीप रायपुरे

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. कुठलाही आडपडदा न ठेवता थेट मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांनाही झापतात. विनोद आणि कोट्या करण्याच्या भानगडीत ते फारसे पडत नाहीत. नाही आवडले तर नाही आणि आवडले तर आवडले इतके ते स्पष्टवक्ते आहे. मात्र, अलीकडे ते बदलले असल्याचे दिसून येते. भाषणांमध्ये गमतीजमतीही करायला लागले आहेत. याची प्रचिती एका अधिकाऱ्याला आली.

मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एका समारंभात मंचावरून त्यांची नजर प्रेक्षकामध्ये बसलेल्या एका अधिकाऱ्यावर पडली. त्या अधिकाऱ्याच्या मिशीची स्टाईल पाहून अजित पवारांनी त्या अधिकाऱ्याला थेट मंचावर बोलविले. त्यांची आगळीवेगळी मिशी निरखून बघितली आणि वा काय मस्त मिशी आहे हो तुमची अशी कौतुकाची थापही दिली. सोबतच त्यांच्या हातावरील टॅट्युही निरखून बघितला. अजितदादांच्या कौतुकाने बीडीओ संजय पुप्पलवार हे देखील चकीत झाले.

'मुछे होतो तो नथ्थुलाल जैसी...वरना ना हो' हा शराबी चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा डाॅयलाॅग त्याकाळात चांगलाच गाजला होता. आता नथ्थुलाल यांच्या नंतर बीडीओ संजय पुप्पलवार यांची मिशीची चर्चा चंद्रपूर जिल्ह्यात असल्याचे हास्यविनोद करत काही जण म्हणत आहेत.

Ajit Pawar appreciating BDO Sanjay Puppalwar’s mustache during an event.
Aaditya Thackeray Letter : उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर, इकडे आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना पत्र पाठवत केले एक घाव दोन तुकडे!

मुंबई येथील टाटा थीएटर येथे सोमवारला राज्य शासनाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,शिक्षणमंत्री दादा भुसे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुशीला पुरेडडीवार यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.पुरस्कार घेण्यासाठी त्या आपले पती संजय पुप्पलवार यांच्यासमवेत गेल्या होत्या. संजय पुप्पलवार हे गोंडपिपरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Ajit Pawar appreciating BDO Sanjay Puppalwar’s mustache during an event.
Sonam Wangchuk News : लडाखमध्ये आंदोलन सुरू असतानाच सोनम वांगचुक यांना धक्का; अमित शहांच्या गृह मंत्रालयाचं मोठं पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com