Sonam Wangchuk News : लडाखमध्ये आंदोलन सुरू असतानाच सोनम वांगचुक यांना धक्का; अमित शहांच्या गृह मंत्रालयाचं मोठं पाऊल

CBI Probing FCRA Violation Against Sonam Wangchuk’s Institution : केंद्रीय गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांच्या संस्थेची सीबीआयमार्फत चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
"CBI initiates inquiry into alleged FCRA violation by Sonam Wangchuk’s Ladakh-based institution."
"CBI initiates inquiry into alleged FCRA violation by Sonam Wangchuk’s Ladakh-based institution."Sarkarnama
Published on
Updated on

FCRA violation case : लेह-लडाखमध्ये बुधवारी युवकांनी जाळपोळ, तोडफोड केल्यानंतर गुरूवारी मोठी बातमी समोर आली आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण कार्यरर्ते सोनम वांगचुक यांनी 15 दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. हिंसेनंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. पण या आंदोलनादरम्यान त्यांना मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांच्या संस्थेची सीबीआयमार्फत चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत वांगचुक यांनीची पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. विदेशी अंशदान विनयमन अधिनियम (एफसीआरए) चे उल्लंघन केल्याचा दावा अमित शाह यांच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने असून त्याची चौकशी सीबीआयकडून सुरू करण्यात आली आहे.

याबाबत पीटीआयशी बोलताना सोनम वांगचुक यांनी सांगितले की, जवळपास दहा दिवसांपूर्वी सीबीआयची टीम त्यांच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ आल्टरनेटिव्स, लडाख (एचआयएएल) संस्थेत आली होती. सीबीआयने सांगितले की, त्यांना गृह मंत्रालयाकडून तक्रार आली आहे. संस्थेला बेकादेशीरपणे विदेशातून फंडिग मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. पण अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

"CBI initiates inquiry into alleged FCRA violation by Sonam Wangchuk’s Ladakh-based institution."
PM Modi on GST : आता आम्ही थांबणार नाही..! ‘जीएसटी’चा बोजा कमी करताच 3 दिवसांत मोदींचे मोठे संकेत

आम्हाला विदेशातून मिळणाऱ्या फंडावर अवलंबून राहायचे नाही. आम्ही आमचे ज्ञान निर्यात करून महसूल जमवतो. तीन सेवा करारांना विदेशी फंडिंग समजण्यात आले. आम्ही त्याचा करही सरकारकडे भरला आहे. हे करार संयुक्त राष्ट्र, एक विद्यापीठ आणि एका इटालियन संघटनेशी संबंधित असल्याचेही वांगचुक यांनी स्पष्ट केले.

सीबीआयने एचआयएएल आणि स्टूडंट्स एज्युकेशनल अन्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखशी संबंधित 2022 ते 2024 दरम्याच्या फंडिंगची कागदपत्रे मागितली आहेत. तपास अधिकाऱ्यांकडून मात्र, 2020 आणि 2021 मधील संस्थांशी संबंधित शाळांची कागदपत्रेही सीबीआयकडून मागितली जात असल्याचा आरोप वांगचुक यांनी केला आहे.

"CBI initiates inquiry into alleged FCRA violation by Sonam Wangchuk’s Ladakh-based institution."
Ladakh youth protest : लडाखमधील तरूणाईने का पेटवलं भाजप कार्यालय, एवढा संताप का? काय आहे 6 वी अनुसूची? आगडोंब उसळण्यामागची संपूर्ण स्टोरी...

संस्थेच्या शाळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतात. या शाळांमध्ये विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये काम करतात, त्याबदल्यात त्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते, असे वांगचुक यांनी सांगितले. ही कारवाई म्हणजे नियोजित रणनीतीचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

आधी पोलिसांनी माझ्यावर राजद्रोहची केस केली. नंतर संस्थेला दिलेली जमीन परत घेण्याचे आदेश दिले. आता सीबीआय आणि आयकर विभाग चौकशी करत आहे. लडाखमध्ये कर लागत नाही, पण तरीही मी स्वेच्छने कर भरतो. त्यानंतरही मला नोटीस येत असल्याची नाराजी सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बुधवारी लडाखमधील आंदोलन वांगचुक यांच्या भडकाऊ भाषणांमुळे झाल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com