Nitin Deshmukh : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या आमदारामागं 'एसीबी'; काढला जुना मुद्दा उकरून

Akola ACB : आमदार नितीन देशमुख हे 2009 ते 2019 या दशकात जिल्हा परिषदेचे सदस्य होते. या काळात काही गैरप्रकार झाला नाही ना, याची माहिती एसीबी काढत असल्याचे बोलले जात आहे.
Nitin Deshmukh
Nitin DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Akola Political News : राज्यभर सध्या विधानसभा निवडणुकीचे रण पेटले आहे. महायुती सत्ता राखण्यासाठी आणि महाविकास आघाडी सत्ता खेचण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यातूनच 'साम-दाम-दंड-भेद'चा वापर होणार असल्याची चर्चा आहे.

याचा अनुभव आता ठाकरे गटाचे आमदार घेत आहेत. अकोल्यातली बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे अॅन्टी करप्शन ब्यूरोच्या रडारवर आहेत. देशमुखांचे जुने प्रकरणाची माहिती मागवण्याचे ऐन निवडणूक देशमुखांसह ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आमदार होण्यापूर्वी नितीन देशमुख Nitin Deshmukh हे अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यावेळी त्यांच्या कार्यकाळातील कामांची माहिती अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागवली आहे. त्याबाबत एसीबीने अकोला जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना पत्र दिले आहे. त्यामुळे आमदार देशमुख जुन्या प्रकरणामुळे अडचणी येण्याची शक्यता आहे.

एसीबीने जिल्हा परिषद सदस्य असताना नितीन देशमुख यांनी वापरलेला विकास निधी, त्यांनी केलेली कामे आणि सदस्य म्हणून घेतलेले सर्व भत्ते, आदी माहितीबाबत विचारणा केली आहे. दरम्यान, या माहिती मागवण्यामागे नेमका काय हेतू आहे, त्यातून काय निष्पन्न होणार, याची माहिती मिळत नाही. मात्र एसीबीच्या या निर्णयाने देशमुख यांची ऐन विधानसभेच्या तोंडावर अडचण होणार असल्याची चर्चा आहे.

Nitin Deshmukh
Video Supriya Sule : तू 1500 रुपये परत घेऊनच दाखव, मग बघ तुझा कसा कार्यक्रम करते! सुप्रिया सुळेंचा रवी राणांना दम

आमदार नितीन देशमुख हे 2009 ते 2019 या दशकात जिल्हा परिषदेचे सदस्य होते. या काळात काही गैरप्रकार झाला नाही ना, याची माहिती एसीबी काढत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2023 मध्ये एसीबीने आमदार देशमुखांची बेहिशेबी मालमत्तेचा आरोप करून चौकशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात पडले असतानाच आता एसीबीने पुन्हा एकदा आमदार देशमुख यांच्याशी संबंधित फाईल्स उघडल्याची चर्चा आहे.

शिवसेनेत बंड झाले त्यावेळी शिंदे गटातील सर्व आमदार सुरुवातीला सुरत आणि नंतर गुवाहटीला गेले होते. त्यात आमदार नितीन देशमुखांचाही समावेश होता. मात्र ते परतले आणि मला फसवून नेण्यात आल्याचे स्पष्ट करत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महायुती सरकार आले आणि त्यांची सहा महिन्यातच चौकशी झाली होती.

Nitin Deshmukh
Devendra Fadnavis : 'अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही; एकदा दिली की..' - फडणवीसांनी रवी राणा अन् महेश शिंदेंना सुनावलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com