Accident News
Accident Newssarkarnama

Akola Accident News : आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात; चार जणांचा मृत्यू

Akola Accident News : अकोल्यातील पारतूर येथे या अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अकोला जिल्ह्यात भीषण ( Akola Accident ) अपघात झाला आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक ( Kiran Sarnaik ) भावाच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातूर शहरानजीक ही भीषण दुर्घटना घडली आहे. दोन कार एकमेकांवर जोरदार आदळल्या. हा अपघात एवढा भीषण होता की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाची ही कार होती. या कारमध्ये सरनाईक यांचे पुतणे, पुतणी आणि नात होती. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com