Akola District Political News : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांना युवा कार्यकर्त्यांनी घेराव घालत रस्त्याचा कामाचा जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. तुम्हाला आमदार कशासाठी निवडून दिले, आदी प्रश्नांचा भडिमार आमदार पिंपळे यांच्यावर करण्यात आला. (A complaint has been made to the police station about the threat)
दरम्यान आमदार समर्थकांनी शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे हे रविवारी (ता. २२) रात्री आपल्या मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गडावर देवीच्या दर्शनासाठी गेले होते.
या परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून चिंचोली रुद्रायणी येथे जाण्यासाठी असलेले रस्ते खराब झाले आहेत. रस्त्याच्या मागणीसाठी यापूर्वी गावकऱ्यांकडून निवेदन देण्यासह आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र अद्यापही कोणतीच दखल न घेतल्याचा आरोप तरुणांनी केला. आमदार आपल्या मतदारसंघातील रस्त्याचे काम का करीत नाही, म्हणून चिंचोली रुद्रायणी येथील युवा कार्यकर्त्यांनी आमदार पिंपळे यांना घेराव घातला.
कामे का करीत नाही, म्हणून जाब विचारला. यावेळी मतदार विरुद्ध आमदार असा सामना रंगला होता. आम्ही तुम्हाला आमदार म्हणून कशासाठी निवडून दिले, अशा प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. रुद्राक्ष राठोड यांनी रस्त्याच्या कामाबाबत जाब विचारला असता, अकोला जिल्हा परिषद या कामासाठी एनओसी देत नसल्याने सदर रस्ता करता आला नाही, असे उत्तर आमदारांनी दिले.
आमदार हरीश पिंपळे आणि या युवा कार्यकर्त्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर आमदार समर्थकांनी आपल्याला धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याचा आरोप रुद्राक्ष राठोड यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी रुद्राक्ष राठोड यांनी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात आमदार हरीश पिंपळे यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
नेमकं काय घडलं?
चिंचोली येथील रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी आमदार हरीश पिंपळे हे रविवारी (ता. २२) रात्री संध्याकाळच्या सुमारास गेले होते. यावेळी उपस्थित असलेल्या चिंचोली रुद्रायणी येथील रुद्राक्ष राठोड यांनी त्यांना आपण १५ वर्षांपासून या भागाचे आमदार आहात.
अजूनपर्यंत या ठिकाणी येण्याकरिता चिंचोली गावातून चांगला रस्ता नाही. तेव्हा आमदार पिंपळे म्हणाले की, हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत आहे. जिल्हा या परिषद एनओसी देत नसल्याने सदर कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेने एनओसी दिल्याशिवाय सदर रस्ता करता येत नाही. इतर रस्ते मंजूर झाले आहेत. लवकरच ते सुरू होणार आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान मी आमदार हरीश पिंपळे यांना रस्त्याच्या संदर्भात जाब विचारला असता त्यांच्या सोबतच्या आठ ते १० व्यक्तींनी शिवीगाळ करून हाणामारी केली व जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला रुद्राक्ष राठोड यांनी दिली आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.