Akola Congress Dispute : फोटो काढण्याच्या वादावरून अंगावर जाणाऱ्या 'त्या' काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चौकशी होणार?

Akola Congress Dispute : काँग्रेसमधील एका गटाचा बांध फुटला..
Akola Congress Dispute :
Akola Congress Dispute :Sarkarnama
Published on
Updated on

Akola Congress Dispute : फोटोसाठी समोर उभं राहण्याच्या क्षुल्लक कारणावरून काँग्रेसचे दोन पदाधिकारी एकमेकांना जोरदार भिडले होते. एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंतचा प्रकार हा अकोल्यात घडला होता. पत्रकार आणि काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला. या घटनेची राज्यभरात जोरदार चर्चा घडून आली. (Latest Marathi News)

दरम्यान, आता या 'वादाची' चौकशी आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून होणार आहे. चौकशी केल्यानंतर तसा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सोपविणार असल्याची माहिती पक्षनिरीक्षक नाना गावंडे यांनी 'सरकारनामा'ला बोलताना दिली आहे. त्यामुळे चौकशीनंतर या प्रकरणी काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola Congress Dispute :
Dharashiv Loksabha Constituency : धाराशिवची जागा शिवसेनेची, पण भाजप म्हणते आमची तयारी पूर्ण; महायुतीत ठिणगी...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अकोला काँग्रेसमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नागपूर येथील बैठकीत काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये चांगलाच राडा झाल्याचा प्रकार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरच घडल्याची घटना ताजी असतानाच अकोल्यातही प्रदेश पातळीवरील दोन पदाधिकाऱ्यांचा वाद एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत झाला.

अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर

विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतच फोटो काढण्यासाठी उभे समोर राहण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. प्रदेश पदाधिकारी डॉ. अभय पाटील आणि माजी महापौर मदन भरगड यांच्यातील वादामुळे काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली, तर या वादामध्ये एकाने बंदुकीने उडविण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वादानंतर ' आता पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष' अशी बातमी 'सरकारनामा'ने दिली होती. दरम्यान, या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षनिरीक्षक नाना गावंडे यांना या वादाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

Akola Congress Dispute :
NCP Crisis : मोठी बातमी ! जयंत पाटलांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन; 'ते' आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा

चौकशी करून अहवाल पाठवल्या जाणार

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे हे २१ ऑक्टोबर रोजी अकोल्यात येणार आहेत. अकोल्यातील स्वराज्य भवन येथे या वादाची स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत व झालेल्या वादाची माहिती घेऊन तसा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवणार आहेत. अशी सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाना गावंडे यांना दिल्या आहेत. १६ ऑक्टोबर रोजी काँग्रेसची बैठक पार पडली. तसेच १७ ऑक्टोबर रोजी काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. या दोन्ही कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून या प्रकरणी माहिती घेण्यात येणार आहे, तर प्रदेश सचिव मदन भरगड व प्रदेश महासचिव डॉ. अभय पाटील यांच्यातील वादाची चौकशी करणार आहेत. हे प्रकरण पक्षशिस्तीचा भंग करणारे असल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

अभय पाटील लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा

वाद करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांपैकी डॉ. अभय पाटील यांची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा होत आहे आणि याच कारणामुळे दोघांमध्ये वाद बाहेर आल्याचे बोलले जात आहे. लोकसभेसाठी पक्षाच्या आंदोलनात नाही, बैठकांना नाही, असे असताना लोकसभा उमेदवारी कशी काय मागता? म्हणून काँग्रेसमधील एका गटाचा बांध फुटला त्यातूनच हा वाद झाल्याचे बोलले जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com