Akola Riots News: ठाकरे गटाने घेतली मृत विलास गायकवाडच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी…

Shivsena News: शिवसेनेच्यावतीने गायकवाड कुटुंबीयांना रोख एक लाखाची मदत देण्यात आली.
Shivsena - Uddhav Thackeray, Akola
Shivsena - Uddhav Thackeray, AkolaSarkarnama

Akola City Riots News : जुने शहरातील हरिहर पेठ परिसरात दोन समाजांमध्ये झालेल्या वादात ठार झालेले विलास गायकवाड यांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्वीकारली आहे. (Shiv Sena has accepted the responsibility of marriage.)

मृत गायकवाड यांच्या कुटुंबीयांची ठाकरे गटाचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेनेच्यावतीने गायकवाड कुटुंबीयांना रोख एक लाखाची मदत देण्यात आली. सोबतच विलास गायकवाडच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली.

माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहरप्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, उपजिल्हा प्रमुख मंगेश काळे, निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पवनीकर, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, नितीन ताकवाले, योगेश गीते, नितीन मिश्रा, अनिल परचुरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य सरकार व भाजपचीही मदत..

विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्यावतीने चार लाख रुपये व भाजपतर्फे एक लाख रुपयांच्या धनादेश काल. (ता. १५) सोपविण्यात आला. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले. गायकवाड परिवारातील पाल्यांना आमदार वसंत खंडेलवाल यांच्याकडून शैक्षणिक खर्च दिला जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

Shivsena - Uddhav Thackeray, Akola
Akola District APMC : आता निवडणूक सभापती-उपसभापतिपदासाठी, राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू !

भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, अनुप धोत्रे, भाजप महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, माधव मानकर, वसंत बाछुका, जयंत मसने, शिवसेनेचे मुरलीधर सटवाले, अमोल गोगे, संतोष पांडे, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी, संजय गोटफोडे, अमोल गीते आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी घटनेची दाखल घेऊन तातडीने शासनाकडून आपत्कालीन मदतीचा धनादेश मयताच्या कुटुंबीयांना सोपविल्याची माहिती आमदार (MLA) सावरकर यांनी दिली. यावेळी शासनातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सुनील पाटील, नंदकिशोर माहोरे व जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते.

Shivsena - Uddhav Thackeray, Akola
Amol Mitkari On Akola Riots : अकोल्यात दोन गटांत राडा; राष्ट्रवादीच्या मिटकरींचा भाजपवर गंभीर आरोप, केली 'ही' मागणी

संचारबंदीत उठली..

अकोला (Akola) शहरातील चार पोलिस (Police) स्टेशनच्या हद्दीत लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे मुख्य बाजार पेठेत कालपर्यंत शुकशुकाट होता. रविवार व सोमवार सलग दोन दिवस व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे सोमवारी सकाळी जुने शहरासह मुख्य बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी संपर्क साधला. अखेर काल संध्याकाळी संचारबंदीमध्ये बदल करण्यात आल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com