Akola District APMC : आता निवडणूक सभापती-उपसभापतिपदासाठी, राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू !

Election : १७ ते २२ मे दरम्यान बाजार समित्यांमध्ये‎ दोन्ही पदाकरिता निवडणूक होणार आहे.
Congress, NCP, BJP and Shivsena - Uddhav Thackeray
Congress, NCP, BJP and Shivsena - Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Akola District APMC News : अकोला जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक झाली. आता सहकार क्षेत्राला सभापती व उपसभापती निवडीचे वेध लागले आहेत. १७ ते २२ मे दरम्यान बाजार समित्यांमध्ये‎ दोन्ही पदाकरिता निवडणूक होणार आहे. (Election will be held for both the posts)

अकोला जिल्‍ह्यातील सात कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांच्‍या संचालकपदांच्‍या निवडणुकीनंतर आता सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडीचे वेध सहकार क्षेत्राला लागले आहे. जिल्ह्यातील अकोट आणि बाळापूर बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड २० मे, पातूर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड २१ मे आणि तेल्हारा बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड २२ मे रोजी होणार आहे.

या निवडीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अकोला जिल्‍ह्यातील बव्हंशी बाजार समित्‍यांवर महाविकास आघाडीने भाजप व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मदतीने वर्चस्‍व प्रस्‍थापित केले आहे. तेल्हारा येथे मात्र वंचित बहुजन आघाडीने सरकार क्षेत्राला धक्का दिला. अकोला बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष धोत्रे यांच्या नेतृत्वातील सरकार पॅनलने बाजी मारली होती. त्यांचे नऊ सदस्य निवडून आले आहेत.

भाजपचे (BJP) पाच तर काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे अकोला बाजार समितीमध्ये भाजपकडून उपसभापतिपदासाठी आग्रह धरला जाऊ शकतो. या ठिकाणी सभापतिपदी व उपसभापतिपदाची अविरोध निवड होण्‍याची शक्‍यता आहे. अकोट बाजार समितीमध्ये सहकार गटाने वर्चस्व मिळविले होते. येथे सभापतिपदासाठी प्रशांत पाचडे आणि धीरज हिंगणकर या सरकार क्षेत्रातील दोन दिग्गजांचे नाव चर्चेत आहेत.

Congress, NCP, BJP and Shivsena - Uddhav Thackeray
Amol Mitkari On Akola Riots : अकोल्यात दोन गटांत राडा; राष्ट्रवादीच्या मिटकरींचा भाजपवर गंभीर आरोप, केली 'ही' मागणी

पातूरमध्ये सहकार गटाचे राजेश महल्ले यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. बाळापूर बाजार समितीमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख सेवकराम ताथोड यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील ‘मामा’ची सभापतिपदावर अविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मूर्तिजापूर येथे माजी आमदार ॲड. भैय्यासाहेब तिडके यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. त्यामुळे सभापतिपदावर त्यांची निवड अविरोध होण्याची शक्यता आहे. मूर्तिजापूर बाजार समितीच्या सभापतिपदाची निवड १८ मे रोजी होणार आहे.

तेल्हाऱ्यात प्रथम ‘वंचित’ला मिळाली संधी..

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) सहकार क्षेत्रातील दिग्गजांना धक्का देत वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत मिळून सत्ता मिळविली. त्यामुळे सभापतिपदासाठीची प्रथम संधीही वंचित बहुजन आघाडीलाच (Vanchit Bahujan Aghadi) मिळणार आहे. सभापतिपदासाठी ‘वंचित’तर्फे श्याम धोंगे आणि सुनील इंगळे यांची नावे चर्चेत आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते सभापतिपदासाठीचे नाव निश्चित करतील, असे सांगितले जात आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com