Akola Former MLA News: आमदारकी गेली तरी स्टिकरचा मोह सुटेना, ‘या’ माजी आमदाराची जिल्हाभर चर्चा !

MLA Baliram Shiraskar News: एका माजी आमदाराची गाडी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
Baliram Shiraskar, Formar MLA, Balapur, Akola.
Baliram Shiraskar, Formar MLA, Balapur, Akola. Sarkarnama
Published on
Updated on

Akola District Balapur's Former MLA's News : आमदार आणि खासदारांच्या गाडीवर त्यांचे पद आणि अशोक स्तंभाचे स्टिकर लावलेले असतात. मात्र, असे स्टिकर लावणे हे बेकायदेशीर असून, यामुळे थेट आमदार आणि खासदारांवरसुद्धा कारवाई केली जाऊ शकते. अकोल्यात एका माजी आमदाराची गाडी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

‘या’ माजी आमदाराने विधानसभा सदस्य लिहिलेले अशोक स्तंभाचे स्टिकर लावले आहे. आमदार नसतानाही गाडीवर स्टिकर लावणे म्हणजे बेकायदेशीर आहे. मात्र, माजी आमदारांचे 'स्टिकर प्रेम' अजूनही कायम आहे. त्यांच्या या स्टिकर प्रेमाची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार राहिलेले भाजपचे नेते बळीराम सिरस्कार हे सध्या आमदार जरी नसले तरी गाडीवर अशोक स्तंभ लावून फिरत आहेत. वंचित बहुजन आघाडीतून राष्ट्रवादीत आणि आता भाजपमध्ये आलेले माजी आमदार बळीराम सिरस्कार यांची गाडी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कारण गाडीवर सर्रासपणे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असलेले अशोक स्तंभाचे स्टिकर लावून ते बिनधास्त फिरत आहेत.

निवडणुका जवळ आल्या आहेत. माजी आमदार बळीराम सिरस्कार यांना बाळापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून तिकीट मिळण्याची आशा आहे. अशातच गाडीवर स्टिकर लावून 'मी पुन्हा आमदार होणार', असं तर त्यांना सांगायचं नसेल? काहीही असो पण वाहनांवर अशोक स्तंभ लावण्यास मनाई असताना त्याचा सर्रासपणे वापर का होतो, कारवाई का केली जात नाही, असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारले जात आहेत. स्टिकरच्या संदर्भात शिरस्कार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

कोण आहेत बळीराम सिरस्कार?

बळीराम सिरस्कार हे भारिप बहुजन महासंघाकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात सलग १० वर्षे आमदार राहिलेले आहेत. सिरस्कार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचितने तिकीट नाकारल्याने सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचा आरोप करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांना बाळापूर मतदारसंघात भाजपकडून तिकीट मिळण्याची आशा आहे.

Edited By : Atul Mehere

Baliram Shiraskar, Formar MLA, Balapur, Akola.
Akola Fadanvis News : फडणवीसांचा ‘हा’ जिल्हा सोसतोय भारनियमनाचे चटके, कुठे कमी पडली ‘ऊर्जा’?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com