Murtijapur - Akola
Murtijapur - AkolaSarkarnama

Akola MLA News: आमच्या हक्काचे पाणी द्या; आमदार पिंपळेंच्या विरोधात नागरिक रस्त्यावर !

Devendra Fadanvis : पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंजूर योजना रद्द करण्यासाठी पत्र दिले आहे.

Akola Political News : 'पिंपळे साहेब आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या’, अशी मागणी आज बार्शीटाकळी येथे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे. मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंजूर योजना रद्द करून केंद्र सरकारची नवी योजना मंजूर करण्यासाठी पत्र दिले आहे. (A letter has been sent to Guardian Minister Devendra Fadnavis to cancel the approved scheme)

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून बार्शीटाकळी शहरवासीयांसाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना रद्द करून केंद्र शासनाची अमृत २.० योजना शहरवासीयांसाठी मंजूर करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र आमदार पिंपळेंनी दिले आहे. दरम्यान, आमदार हरीश पिंपळे यांनी दिलेल्या पत्राची दखल न घेता जी योजना मंजूर झाली तीच लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी आज (ता. १८) संतप्त नागरिकांनी केली.

शहरात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बऱ्याच वर्षांपासून बंद पडलेली आहे. बार्शीटाकळीवासीयांचे हाल होत आहेत. महिला असो की, शाळेतील विद्यार्थी (Student) तसेच नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातील बार्शीटाकळी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन आठ वर्षे झाली. मात्र, येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था असो की, राज्याचे लोकनेते यांपैकी कोणीही अद्याप बार्शीटाकळीवासीयांसाठी सर्वांत मोठी पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावली नाही. यापूर्वी शहरवासीयांना पाणीपुरवठा होण्याचा मार्ग सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाद्वारे देण्यासाठी शासनाने सकारात्मकता दाखविली.

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना महाराष्ट्र (Maharashtra) सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना रद्द करून सदर योजनेमधून राबवणारी पाणीपुरवठा योजना रद्द करून केंद्र शासनाची अमृत २.० ही योजना शहरवासीयांसाठी मंजूर करण्याचे पत्र दिले.

या पत्रामुळे मंजूर योजना रद्द होईल. बार्शीटाकळी ग्रामपंचायत असताना ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. तेव्हापासून नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाणीपुरवठा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला होता. मात्र, यश आले नाही. त्यात सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून पाण्याची समस्या सुटण्याची आस होती.

आमदार पिंपळे यांच्या पत्रामुळे तेही नामंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार हरीश पिंपळे यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. काहींनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून संताप व्यक्त केला आहे.

अशातच निवडणुका जवळ आल्या आहेत. पाणीटंचाईवरून बार्शीटाकळी येथील वातावरण तापलं असून, याचा मोठा फटका पिंपळे यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची परवानगी न मिळाल्याने निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

Edited By : Atul Mehere

Murtijapur - Akola
Akola Fadanvis News : फडणवीसांचा ‘हा’ जिल्हा सोसतोय भारनियमनाचे चटके, कुठे कमी पडली ‘ऊर्जा’?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com