

Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' रंगल आहे. भाजप अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात युतीचं चित्र अंतिम टप्प्यात येत, असताना काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे.
सत्तेसाठी आमचे सर्व दरवाजे खुले असून, आम्हाला कोणतेही पद नको, सर्व पद तु्म्ही घ्या, अन् भाजपला रोखा, असे म्हणत, खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसच्या या 'ऑफर'मुळे, अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेत अनेक राजकीय 'ट्विस्ट' येत असल्याने, राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अकोला महापालिकेत बहुमताच्या आकड्यासाठी 41ची संख्याबळ हवं आहे. अकोल्यात भाजप 38, काँग्रेस 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष सहा, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी प्रत्येक एक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि AIMIM पक्षाला प्रत्येकी तीन आणि वंचित बहुजन आघाडीला पाच, तर अपक्ष म्हणून दोन नगरसेवक निवडणूक आले आहेत.
सत्ता जुळवणीसाठी भाजपने (BJP) थेट शिवसेना ठाकरे पक्षाला 'ऑफर' दिली आहे. भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि शिवसेना ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची अकोल्यात बैठक झाली आहे. या बैठकीची चर्चा असतानाच, शिवसेना ठाकरे सेना पक्षाने उपमहापौरपद अन् स्थायी समिती सभापतीची मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
भाजप अन् शिवसेना ठाकरे सेनेच्या बैठकीत, शहरातील विकासाच्या महत्त्वाचे मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. 'जो आमच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका दाखवेल, त्याच्यासोबत आम्ही जाणार, तसेच सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत,' अशी भूमिका आमदार नितीन देशमुख यांनी म्हटले.
दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे नगरसेवक संजय गव्हाळे यांची प्रतिक्रिया समोर आली. ते म्हणाले, "आम्ही अमरावतीमध्ये तटस्थ राहू, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना जे साथ देतील, त्यांच्या पाठिशी आम्ही राहणार, जे महाराष्ट्र अन् मुंबईच्या हिताचा निर्णय घेतील, त्यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ, आम्हाला कोणीही गृहीत धरू नये". मुंबईमध्ये भाजपने आम्हाला पाठिंबा दिला, तर आम्ही त्यांना इथं देऊ, बीजेपीपेक्षा आम्हाला उद्धव ठाकरे महत्त्वाचे आहे, पडतीच्या काळात त्यांना साथ देणं आमचं काम आहे, असेही संजय गव्हाळे यांनी म्हटले.
भाजप अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सूर जुळत असतानाच, काँग्रेसने राजकीय चाल केली आहे. आमचे 21 नगरसेवक आहेत, पण अमरावती महापालिकेत आम्हाला कोणतेही पद नको. भाजप विरोधात सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केलं आहे. आमदार पठाण हे प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहे. सर्वांची बोलणी सुरू आहे. अकोला महापालिकेत लवकरच सत्ता स्थापन करू, असा दावा साजिद खान पठाण यांनी केला आहे.
यानंतर अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' रंगत आहे. भाजप अन् शिवसेना ठाकरे सेना पक्ष सत्तेसाठी जवळ येत असतानाच, आमदार नितीन देशमुख आणि आमदार साजिद खान पठाण यांच्यात देखील बैठक झाल्याचे समोर येत आहे. आता काँग्रेसने शिवसेना ठाकरे सेना पक्षाला मोठा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.