Akola: काठावरच्या भाजपला शरद पवारांचा पाठिंबा; अकोल्यात सत्तेचा मार्ग मोकळा! महापौर अन् उपमहापौरांच्या नावावरही शिक्कामोर्तब

Akola Municipal Corporation : महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला.
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Akola Municipal Corporation : अकोला महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला असून भाजप व मित्रपक्षांच्या शहर सुधार आघाडीने स्पष्ट बहुमत सिद्ध करत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. विभागीय आयुक्तांनी ४४ नगरसेवकांच्या गटाला अधिकृत मान्यता दिल्याने भाजप नेतृत्वाखालील सत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
MNS : गुजराती टेलरकडून मराठी महिलेला अर्वाच्च भोषेत शिवीगाळ! मध्यस्थी केल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भाजपकडे असलेले ३८ नगरसेवक हे संख्याबळ निर्णायक ठरले असले, तरी शिंदे गट, अजित पवार गट, शरद पवार गटातील काही नगरसेवक व अपक्षांना एकत्र आणत राजकीय अंकगणित अचूक जुळवण्यात भाजप यशस्वी ठरली. एकूण ४४ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्याने बहुमताचा आकडा सहज गाठण्यात आला. त्यामुळे काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न निष्फळ ठरले. महापौर पदासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जाहीर केलेले ओबीसी महिला आरक्षण भाजपसाठी अनुकूल ठरले आहे. पक्षाकडून शारदा खेडकर यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित मानले जात असून उपमहापौरपदी अमोल गोगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Panvel Mayor Politics : पनवेलचा ‘महापौर रणसंग्राम’! निष्ठा की समीकरणं? पाटील, म्हात्रे की ठाकूरांचा ‘लेडी ट्रम्प कार्ड’?

अकोला महापालिकेच्या इतिहासात महिलांचे नेतृत्व वारंवार दिसून आले असून, यावेळीही हीच परंपरा कायम राहणार आहे. या सत्तास्थापनेतून भाजपने केवळ संख्याबळच नव्हे तर राजकीय व्यवस्थापन, संवादकौशल्य आणि वेळेवर निर्णयक्षमता यांचा प्रभावी नमुना दाखवून दिला आहे. विरोधकांकडून शेवटच्या क्षणापर्यंत हालचाली सुरू असतानाही भाजपने शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने सत्ता स्थापनेची रणनीती पूर्ण केली. शहर सुधार आघाडीची रचना, गटनेतेपदाची नियुक्ती आणि विभागीय आयुक्तांकडे वेळेत सादर केलेले पत्र यामुळे भाजपने प्रशासकीय आघाडीवरही आघाडी घेतली. आता ३० जानेवारीला सत्ता स्थापनेचा मुहूर्त असल्याचे संकेत असून, महापालिकेतील धोरणात्मक निर्णयांवर भाजप व मित्रपक्षांचा प्रभाव स्पष्टपणे दिसणार आहे. विकासकामे, प्रशासनावर पकड आणि आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने ही सत्ता भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Shiv Sena Split : शिवसेनेत पुन्हा फूट? पुन्हा बंडाची शक्यता; बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचा खासदारांचा दावा

आमदार रणधीर सावरकर : सत्तास्थापनेमागील ‘धुरंधर’

भाजप प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर हे या संपूर्ण सत्तास्थापनेमागील मुख्य सूत्रधार ठरले आहेत. संख्याबळ असूनही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली राजकीय जुळवाजुळव, मित्रपक्षांशी संवाद आणि योग्य वेळ साधणे या सर्व बाबी सावरकर यांनी अत्यंत कुशलतेने हाताळल्या. शिंदे गट, अजित पवार गट व शरद पवार गटातील नगरसेवकांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करत त्यांनी विश्वासाचे वातावरण निर्माण केले. विरोधकांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी पडद्यामागे हालचाली वेगाने पूर्ण केल्या. परिणामी, भाजपकडे बहुमत असल्याची घोषणा केवळ शब्दांत न राहता ती प्रत्यक्षात साकार झाली. या यशस्वी सत्तास्थापनेमुळे रणधीर सावरकर यांची ओळख फक्त आमदार म्हणून नव्हे, तर प्रभावी राजकीय रणनीतीकार म्हणून अधिक ठळकपणे समोर आली आहे. आगामी काळात अकोला जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक निर्णायक ठरेल यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com