MNS : गुजराती टेलरकडून मराठी महिलेला अर्वाच्च भोषेत शिवीगाळ! मध्यस्थी केल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

MNS : मराठी माणसाची बाजू घेणे गुन्हा ठरते का? असा सवाल विचारत मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने वाद निर्माण झाला आहे.
Borivali News
Borivali News
Published on
Updated on

बोरिवली : एका गुजरातील पुरष टेलरकडून मराठी महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ अन् धमकी दिल्याप्रकरणी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणात मध्यस्थी केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकाराचा मराठी जनांनी निषेध नोंदवला असून मराठी माणसाची बाजू घेणं गुन्हा ठरतंय का? असा सवाल विचारला जात आहे.

Borivali News
Balasaheb Thackeray: आता मशालीची धग...! बाळासाहेबांचं जुनं व्यंगचित्र शेअर करत शिवसेनेनं भाजपला डिवचलं

नेमका प्रकार काय?

बोरिवलीतील एक्सर गावात राहणाऱ्या वैशाली म्हात्रे या मराठी महिलेला एका गुजराती लेडीज टेलरकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा प्रकार घडला होता. असं अभद्र भाषेत बोलू नकोस म्हणून वारंवार समाजावूनही तो ऐकत नसल्यानं या महिलेनं थेट स्थानिक मनसेची शाखा गाठली आणि तिथल्या मनसैनिकांना आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते किरण नकाशे आणि विजय पाटील हे पीडित महिलेला घेऊन थेट त्या लेडीट टेलरच्या दुकानात पोहोचले.

मराठी माणसावर झालेल्या अन्यायाविरोधात उभे राहिल्याने मनसेचे किरण नकाशे आणि विजय पाटील यांच्यावर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एक्सर गावात राहणाऱ्या स्थानिक महिला वैशाली म्हात्रे यांना एका अमराठी लेडीज टेलरकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचा प्रकार समोर आला होता. वारंवार समजावूनही संबंधित व्यक्ती न ऐकल्याने पीडित महिलेने मनसे शाखेत धाव घेतली.

या घटनेदरम्यान पीडित मराठी महिलेने संतप्त होऊन संबंधित गुजराती टेलरलच्या कानशिलात लगावल्या. यामारहणावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या मनसेचे किरण नकाशे व विजय पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे मराठी माणसाच्या बाजूने उभे राहणे गुन्हा ठरते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com