Akola Shivsena : विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

Crop Insurance : अकोल्यात पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा, तीन ठिकाणी झालं होतं आंदोलन
Akola Shivsena
Akola ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Group : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करणं चांगलंच भोवलंय. आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पीकविमा कार्यालयाची तोडफोड केली होती. आता या प्रकरणी अकोला शहरातील खदान पोलिसांनी जिल्हा प्रमुखांसह आठ ते दहा शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीकविमा देण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते. प्रशासनाने दखल न घेतल्याने अकोला जिल्ह्यातील तीन ठिकाणी पीकविमा कार्यालयांची तोडफोड करण्यात आली होती. (Akola Police Logged FIR Against Shivsena Uddhav Thackeray Group For Sabotage at Crop Insurance Company Offices)

सततच्या पावसामुळे गेल्यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. २५ टक्के पीकविम्याची अधिसूचना काढूनही शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नव्हता. जिल्ह्यातील पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविम्याची रक्कम तत्काळ देण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यामुळे पीकविम्याच्या प्रमुख मागणीसह शिवसेना ठाकरे गट शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आक्रमक झाला. जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणही केले.

दातकर यांनी आंदोलनाची दखल न घेतल्यास पीकविमा कार्यालयांची तोडफोड करण्याचा इशारा दिला होता. ९ नोव्हेंबरला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यातील कौलखेड भागात असलेले एचडीएफसी कंपनीच्या पीकविमा कार्यालयात जाऊन तोडफोड केली. त्यानंतर पातूरमध्येही शिवसैनिकांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले. अकोटमध्ये पीकविमा कंपनीचे कार्यालय बंद असल्याने कार्यालयाला काळे फासण्यात आले. जमावबंदीचे आदेश झुगारत करण्यात आलेल्या या हिंसक आंदोलनांमुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यासह उपशहर प्रमुख पवन पवार, सर्कल प्रमुख सचिन बाहाकर व अन्य शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लवकरच पोलिस याप्रकणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तूर्तास शिवसेनेने आंदोलन स्थगित केले आहे. मात्र शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू असे ठाकरे गटाने जाहीर केले आहे. त्यामुळे अद्यापही पोलिस ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Akola Shivsena
Akola Shivsena : अकोल्यात ठाकरे सेनेचा महावितरणला शॉक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com