Akola Kawad Yatra : अकोल्यातील कावड उत्सवात राजकीय पक्षांचे जोरदार शक्तिप्रदर्शन !

Akola : कावड उत्सवाला अकोल्यात मोठे महत्त्व आहे.
akola Kavad festival
akola Kavad festivalSarkarnama

Akola Political News : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवत राजकीय पक्षांनी व इच्छुक उमेदवारांनी आत्तापासून आपला प्रचार सुरू केला आहे. विविध सण, उत्सवांच्या काळाचाही या प्रचारासाठी पुरेपूर वापर करण्यात येत आहे. (Kavad festival has great importance in Akola)

श्रावण महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या कावड उत्सवाला अकोल्यात मोठे महत्त्व आहे. अखेरच्या श्रावण सोमवारी साजरा झालेल्या कावड उत्सवात विविध राजकीय पक्षांनी आपल्या शक्तिप्रदर्शनाची संधी सोडली नाही. कावड उत्सवादरम्यान भारतीय जनता पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

शिवभक्तांच्या स्वागतासाठी उभारलेले पूजा मंडप व कमानींच्या माध्यमातून आपापली शक्ती दाखवून दिली. भाजपच्या वतीने संपूर्ण कावड व पालखी मार्गात १२ ठिकाणी शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यात सर्वांत आघाडीवर होते.

भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा यांचे सुपुत्र कृष्णा शर्मा, अनिता चौधरी, राजेश चौधरी, नितीन राऊत, प्रवीण जाधव, रूपेश यादव, टोनी जयराज, पवन महाले, राजेंद्र गिरी, जान्हवी डोंगरे, सतीश ढगे या नेत्यांनी शिवभक्तांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

काँग्रेसकडून (Congress) सिटी कोतवालीजवळ असलेल्या महाराणा प्रताप चौकात मोठा स्वागत मंडप उभारण्यात आला होता. येथे प्रसाद वितरणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. काँग्रेस प्रदेश सचिव माजी महापौर मदन भरगड यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहत शक्तिप्रदर्शन केले. राजेंद्र चितलांगे, राजेश पाटील, गणेश कटारे, अभिषेक भरगड, मनीष नाराण, सुरज भरगड, प्रदीप खंडेलवाल, राजेश भंसाली, देवीदास सोनवणे, मयूर जोशी भरगड यांच्या साथीला होते.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujkan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मानाच्या सर्व पालख्यांचे पूजन केले. वंचितच्या वतीने शिवभक्तांचा सत्कारही करण्यात आला. वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, नीलेश देव, बालमुकुंद भीरड, अॅड. संतोष रहाटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता आढावू, सुनील फाटकर, विकास सदाशिव, जिल्हा परिषदेच्या सभापती आम्रपाली खंडारे या वेळी उपस्थित होते.

akola Kavad festival
RSS vs BJP News : संघ प्रचारकांचा अपमान करणारा ‘तो’ नेता कोण? भाजपला भोवणार संघाची नाराजी?

आमदार बच्चू कडूप्रणित प्रहार जनशक्ती पार्टीनेही शिवभक्तांचे स्वागत करीत आपले शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने गांधी मार्गावर मोठा फ्लेक्स व मांडव उभारला होता. एकनाथ शिंदे व भाजपच्या नेत्यांचे फोटो या फलकांवर होते. गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. महानगराध्यक्ष विजय देशमुख, माजी आमदार तुकाराम बिडकर, ओम सॉवल, यश सॉवल, अनिल मालगे, सुधीर कहाकर येथे उपस्थित होते.

याच मंडपापासून काही अंतराव शरद पवार गटानेही स्वागत मंडप उभारला होता. येथे खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले. गांधी चौकातच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पालखी व कावडींचे पूजन करण्यात आले. जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, योगेश गिते येथे उपस्थित होते. आगामी काळात आयोजित होणाऱ्या गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सवाच्या काळातही राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखविण्याची पूर्ण तयारी केली आहे.

Edited By : Atul Mehere

akola Kavad festival
Akola Shivsena UBT News: अकोल्यात उद्धव ठाकरेंची ताकद वाढली, वंचितचा ‘हा’ नेता लागला गळाला !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com