RSS vs BJP News : संघ प्रचारकांचा अपमान करणारा ‘तो’ नेता कोण? भाजपला भोवणार संघाची नाराजी?

Sangh Campaigners : अकोल्यात संघ प्रचारकांना दुय्यम वागणूक मिळाली आहे.
Rss - BJP
Rss - BJPSarkarnama

Akola District Political News : भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुरुवातीपासूनच मोठा हात राहिलेला आहे. संघाच्या वरदहस्ताशिवाय आणि संघ परिवारातील सदस्यांच्या मतदानाशिवाय भाजप कोणतीही निवडणूक जिंकू शकेल, असे समीकरण जुळणे अवघड आहे. हे ठाऊक असतानाही अकोल्यात संघ प्रचारकांना दुय्यम वागणूक मिळाली आहे. (In Akola, Sangh pracharaks have received secondary treatment)

प्रचारकांनी अकोल्यात मिळालेल्या वागणुकीची तक्रार वरिष्ठ पातळीवर केली आहे. प्रचारकांना मिळालेल्या चुकीच्या वागणुकीमुळे संघ अकोला भाजपवर तीव्र नाराज आहे. त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बसणार की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करण्यासाठी अकोल्यासह विविध शहरांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये संघाचे प्रचारक फिरत असतात. आपल्या कुटुंबावर तुळशीपत्र वाहून हे प्रचारक अत्यंत निष्ठेने संघाचे कार्य करतात. असेच काही प्रचारक नुकतेच अकोला येथे आले होते. त्यांना अकोल्यातील भाजपच्या काही प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्याची वरिष्ठांकडून सूचना होती.

संबंधित भाजप नेत्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर या प्रचारकांना अनेक तास ताटकळत ठेवण्यात आले. येवढेच नव्हे, तर भेटीदरम्यान अपमानास्पद वागणूक मिळाल्याची अकोला भाजपच्या गटातच दबक्या आवाजात चर्चा आहे.

Rss - BJP
Akola Shivsena UBT News: अकोल्यात उद्धव ठाकरेंची ताकद वाढली, वंचितचा ‘हा’ नेता लागला गळाला !

नेत्यांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे व्यथित झालेल्या संघ (RSS) प्रचारकांनी थेट संघाच्या वरिष्ठांना फोन केला. मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल माहिती देण्यात आली. ही माहिती आता संघाच्या नागपूर (Nagpur) मुख्यालयापर्यंत पोहोचली आहे. ज्या नेत्याने प्रचारकांना ही वागणूक दिली, त्याला अकोला (Akola) भाजपमधील हुकूमशहा म्हणूनच ओळखले जाते. याच तोऱ्यात त्याने प्रचारकांना तुच्छतेची वागणूक दिली. हा नेता कोण, हे जाणून घेण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत असल्याचे दिसते आहे.

या घटनेचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आता संघ वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. तुच्छ वागणूक देणाऱ्या नेत्याला आगामी विधानसभा निवडणुकीत आपली जागा दाखवून देण्याच्या सूचना संघाला अकोल्यात प्राप्त झाल्या असल्याची माहिती आहे. प्रचारकांना मिळालेल्या वागणुकीची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Rss - BJP
Akola Political News: प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'ची मोर्चेबांधणी !

प्रचारकांना मिळालेल्या वागणुकीचा परिणाम अकोल्यातील भाजपवर झाल्यास त्याचा मोठा फटका भाजपला निवडणुकीदरम्यान सहन करावा लागू शकतो, असे नेतेच सांगत आहेत. अकोल्यातील दोन्ही विधानसभा मतदार संघांमध्ये यंदा काट्याची टक्कर होणार आहे. अकोल्यात भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी एका मतदार संघातून भाजपमधील एक माजी महापौर तयारी करीत आहे.

या नेत्याच्या नावाला मतदार आणि पक्षातूनही विरोध आहे. दुसऱ्या मतदार संघावर संघाची नाराजी आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागणार आहे. अशात संघाची नाराजी ओढवून घेणे भाजपला कसेच परवडणारे नाही. त्यामुळे भाजप नेते हे प्रकरण शांत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे समजते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com