Akola riots News : सरकारलाच दंगल घडवायची होती का, अंबादास दानवेंचा सवाल !

Ambadas Danve : गृहविभागाने पोलिसांवर कारवाई करावी.
Ambadas Danve and Nitin Deshmukh
Ambadas Danve and Nitin DeshmukhSarkarnama

Question was asked by Shiv Sena leader Ambadas Danve : व्हायरल पोस्टबाबत तक्रार करायला पोलिस स्टेशनमध्ये गेलेले लोकच दंगलीमध्ये समोर होते. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. एक ते दीड तासाच्या नंतर पोलिस तेथे पोहोचले, यावरून काय समजावे, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला. (Did the rulers fuel the controversy in Akola?)

कुणी तरी व्हायरल केलेल्या पोस्टवरून अकोल्यात दोन समाजांत संघर्ष पेटतो. दोन तास सर्व सामान्यांमध्ये दहशत पेरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी पोलिस कुठे होते? पोलिसांची जबाबदारी होती, ती त्यांनी पार पाडली नसेल तर त्यांच्यावर गृहविभागाने कारवाई करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

कारवाई केली जात नसेल तर सत्ताधाऱ्यांनीच अकोल्यातील वादाला खतपाणी घातले का, असा दानवे यांनी केला. अकोला येथे शनिवारी (ता.१८) दोन समाजात घडलेल्या वादानंतर जाळपोळ झाली. एकाचा बळीही गेला. जुने शहरात घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे विरोधी पक्ष नेते दानवे यांनी शुक्रवारी (ता. १९) या भागाला भेट दिल्यानंतर सांगितले.

अंबादास दानवे यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. अकोल्यातील वाद उफाळण्याचे कारण म्हणजे, येथील पोलिसांचा नागरिकांमध्ये धाकच उरला नाही, असे सांगून दानवे यांनी आजही पोलिस कठोर कारवाईसाठी का धजावत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. पोलिसांनाच दंगल हवी होती काय? सत्ताधाऱ्यांमधील कुणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे?

Ambadas Danve and Nitin Deshmukh
Akola riots : कॅमेऱ्यात जे दिसले, त्यांना अटक करून उपयोग नाही; त्याच्या मागे कोण, हे शोधा…

घटनेनंतर पोलिस दहशत माजविणाऱ्यांना पायबंद घालते की प्रोत्साहन देत आहे, हेच कळत नसल्याचे ते म्हणाले. हे सर्व बघता सरकारलाच (Government) दंगल व्हावी, असे वाटत असल्याचा आरोपाही दानवे यांनी केला. पत्रकार परिषदेला आमदार नितीन देशमुख, माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, संजय गावंडे, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हा प्रमुख विकास पागृत, अतुल पवणीकर, दिलीप बोचे आदींची उपस्थिती होती.

तक्रार घेऊन आलेलेच पुढे होते, कारवाई का नाही?

अकोल्यात (Akola) शनिवारी रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन आलेलेच दोन समाजात वाद घडवून आणण्यासाठी पुढे होते. त्यांनीच पोस्ट व्हायरल केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर पोलिसांनी (Police) का कारवाई केली नाही. अकोल्याचे पोलिस (Police) अधीक्षक अकार्यक्षम आहेत. त्यामुळे ते येथील परिस्थिती नीट हाताळू शकले नाही. त्यांच्यावर गृह विभागाने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वजा सूचना अंबादास दानवे यांनी केली.

Ambadas Danve and Nitin Deshmukh
Akola BJP News : अंधारेंच्या नावावर एकमत, पण अग्रवालांच्या नावाला विरोध करणारे ते दोन डॉक्टर कोण?

या मुद्यांकडेही वेधले लक्ष..

- पोलिस अधीक्षक कारवाईबाबत आक्रमक का नाहीत?

- गृहखात्याची गुप्तचर यंत्रणा काय करत होती?

- कारवाई केली पाहिजे, कारवाई होत नसेल तर सरकार व पोलिसांचा पाठिंबा आहे काय?

- देशाचे गृहमंत्री कर्नाटकात दंगली घडविण्याची भाषा करतात, महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे, मग येथे दंगली कुणी घडविल्या, याचे उत्तर दिले पाहिजे.

- भाजपला जातीयतेचे राजकारण करावयाचे आहे का?

- दंगल पूर्व नियोजित असल्याची माहिती गिरीष महाजनांना होती तर त्यांनी ती थांबविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत?

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com