Madhukarrao Kamble Passed Away : मातंग समाजाचे नेते, माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे यांचे निधन

Madhukarrao Kamble : अण्णा भाऊ साठे स्मारक समितीच्या उपाध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती.
Madhukarrao Kamble Passed Away :
Madhukarrao Kamble Passed Away :Sarkarnama
Published on
Updated on

Akola : मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) एक वाजता उमरी स्मशानभूमी (शास्त्रीनगर, अकोला) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कांबळे हे ७० वर्षांचे होते.

राष्ट्रीय लहुशक्तीचे संस्थापक अध्यक्ष असलेले मधुकर कांबळे हे अनेक दिवसापासून आजारी होते. दीर्घ आजारामुळे मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. शेंदाला (जि. बुलढाणा) या गावात एका सामान्य कुटुंबात कांबळे यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून ते समाजकार्यात आणि राजकारणात सक्रीय होते.

Madhukarrao Kamble Passed Away :
Complaint filed Against Gulabrao Patil : पालकमंत्री गुलाबराव पाटलांना दाखवा, ११०० रुपये बक्षीस मिळवा ; पोलीस ठाण्यात तक्रार

विदर्भ विकास महामंडळाच्या संचालकपदी १९८३ मध्ये त्यांनी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी सामाजिक न्याय व समतेसाठी संघर्ष करण्यासाठी त्यांनी दलित समता परिषदेची स्थापना केली.

Madhukarrao Kamble Passed Away :
MP Hemant Patil Slaps Tehsildar: एका मिनिटात तुमच्या अंगातील मस्ती उतरवीन ; शिवसेना खासदाराने तहसीलदाराला झाप झाप झापलं..

महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. २००३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीच्या उपाध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com